खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

नाचून नाही तर वाचून जयंती साजरी करा - दंगलकार नितीन चंदनशिवे

कळंब - छत्रपती शिवाजी महाराज,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आदी महामानवांच्या जयंत्या साजऱ्या करीत असताना त्यांचे विचार समाजात रुजवून त्यांचे राहिलेले अपूर्ण कार्य पूर्ण करून तरुणांनी डीजेच्या तालावर न नाचता त्यांचे विचार वाचणे गरजेचे असल्याचे ठाम प्रतिपादन प्रसिद्ध कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी केले.
विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती सार्वजनिक जयंती उत्सव समिती (पुतळा परिसर) कळंब यांच्या वतीने दि.९ एप्रिल २०२३ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे नामवंत कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम माणिक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प महादेव आडसूळ महाराज, प्रकाश भंडगे, ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत, बौद्धराज रणदिवे,भाऊसाहेब आवाड, मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद ताटे हे होते.

पुढे दंगलकार नितीन चंदनशिवे म्हणाले की,महामानव डॉ. आजच्या युवकांनी अभ्यास करून पदव्या प्राप्त करून चांगल्या दर्जाची नौकरी प्राप्त करून आपले जीवन सुधारले पाहिजे असे उदाहरणासाहित त्यांच्या काव्य पंक्ती सादर केल्या.
या कार्यक्रमास शहरातील असंख्य आंबेडकर प्रेमी नागरिकांनी उपस्थिती होती.

या व्याख्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आले.

या कार्यक्रमास सी. आर.घाडगे, मधुकर शीलवंत, रमेश बोर्डेकर, अँड.शकुंतला फाटक, सुभाष घोडके, भारत कदम, मुकुंद साखरे, नागेश धिरे, मध्यवर्ती सार्वजनिक उत्सव समितीचे सचिव शिवाजी सिरसट, कोषाध्यक्ष सुमित रणदिवे, सहसचिव भाऊसाहेब कुचेकर, संघटक सागर पट्टेकर, निलेश गवळी, सुरज गायकवाड आदींची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात दंगलकार नितीन चंदनशिवे यांचा सत्कार मध्यवर्ती सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक तथा माजी नगरसेवक सुनील गायकवाड यांनी तर विशेष सत्कार प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके लिखित विरंगुळा अर्थात पथनाट्य व अग्रलेखांचा संग्रह असलेले पुस्तक माधवसिंग राजपूत यांनी देवून केला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे मार्गदर्शक माजी नगरसेवक सुनील गायकवाड यांनी सुत्रसंचालन प्रसिद्धी प्रमुख अविनाश घोडके तर आभार उपाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools