खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य चौकातील स्मारकासाठीची जी लढाई होती ती लढाई पूर्णपणे यशस्वी झाली आहे.

भोकरदन - भीम आर्मी भाऊ फाउंडेशन मागील पाच ते सहा वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य चौकातील स्मारकासाठीची जी लढाई होती ती लढाई पूर्णपणे यशस्वी झाली आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मूलमंत्र शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचाराने भोकरदन तालुक्यामध्ये बाबासाहेबांचे विचार गावोगावी जाऊन आम्ही प्रेरित केले आहे व यापुढेही करीत राहू.
मुख्य चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाचे काम हे पूर्णपणे सुरळीत चालू आहे मागच्या वेळेस निवेदन दिले होते की लवकरात लवकर काम सुरू करावे त्या निवेदनाची दखल नगरपरिषद यांनी घेतली आहे.
भीम आर्मी भाऊ फाउंडेशन पॅंथर नेहमी समाजाच्या लढाईमध्ये आपले योगदान देत आले आहेत आमच्या पाठपुराव्याचे हे यशस्वी असे उत्तर आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरळीत चालू आहे लवकरात लवकर हे स्मारकाचे काम पूर्ण होईल आणि भोकरदन शहरांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या भव्य स्मारकाचे अनावरण होईल.

या स्मारकाचे खरी लढाई भीम आर्मी तसेच भाऊ फाउंडेशन पँथर्स पदाधिकारी यांनीच लढलेली आहे आणि हे सर्व भोकरदन तालुक्यातील प्रत्येक गावाला माहिती आहे.

काही समाजविरोधक भीम आर्मीला विरोध करीत आलेले आहे परंतु त्यांच्या विरोधाला आम्ही न घाबरता त्यांच्या छाताडावर बसून आम्ही या स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी नेहमी तयार आहोत व आमच्या बलिदानासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत त्यामुळे असले पोकळ धमक्या देणाऱ्यांना हे उत्तर आहे "उधारी और दुश्मनी हम कभी नही भूलते समय आने पर बराबर हिसाब करते है "

स्मारकाच्या लढाईमध्ये अनिलभाऊ पगारे, किरण आरके, फकीराजी बिरसोने, कृष्णा वेलदोडे, सुधाकर दाभाडे, पंडित बिरसोने, मुकेश आरके, साबीर शेख, शाकीर पैलवान, मुजाहिद खान, शब्बीर मंसूरी यांच्यासह इतरांचे सहकार्य लाभले या सर्वांचे भीम आर्मी व भाऊ फाउंडेशनच्या वतीने मी सर्वांचे आभार व धन्यवाद करतो की तुम्ही असेच या पुढची ही लढाई आमच्या सोबत लढावी 

जय भीम.
किरण आरके .

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools