संविधान जनजागृती यात्रेची सुरूवात हि पुण्याहून महाराष्ट्र अध्यक्ष सिताराम गंगावणे यांच्या वतीने करण्यात येते .
या मध्ये तीन चार चाकी गाड्यांना रथाचे रूप देऊन त्या वर संघटनेचे होर्डिग्ज लाऊन गाडी ला सजवण्यात येते व डिजे, लाईट, फोकस, एलसीडी सारख्या तंत्राने सजवण्यात येते व यातून संविधानाची जनजागृती पूर्ण राज्यात करण्यात येते.
दरवर्षी प्रमाणे हि संविधान जनजागृती यात्रा या वर्षी औरंगाबाद ( संभाजी नगर ) येथे 27/11 रोजी येत असते. या यात्रेचे बाबा पेट्रोल पंप येथे भीम आर्मी जिल्ह्याचे प्रमुख नेते बलराजदादा दाभाडे, बाळुभाऊ वाघमारे यांच्यासह भीम आर्मी पदाधिकाऱ्यांकडून जोरदार असे जंगी स्वागत करण्यात आले ..
त्यानंतर रॅली ही भडकल गेट येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन व घोषणेसह पुढे छ. शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले व माता सावित्रीबाई फुले यांच्या भव्य पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत पुढे क्रांती चौक येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून गुरू गोविंद सिंह चौकात जोरदार घोषणाबाजी करीत अभिवादन करून या संविधान जनजागृतीपर रॅलीचे समापन करण्यात आले.
त्यानंतर भोजनासाठी बाळुभाऊ वाघमारे यांच्या घरी सर्व पदाधिकारी यांनी भोजन करून जालन्याकडे यात्रेचे संचलन केले.
या संविधान जनजागृतीपर रॅलीचे शहरात कौतुक होत आहेत असे आमचे प्रतिनिधी यांनी पदाधिकाऱ्यांसह औरंगाबाद शहरातील नागरिकांशी जाणून घेतले..
जयभीम
- किरण आरके
0 Comments