औरंगाबाद - ( 5 डिसेंबर 2023 मंगळवार ) भारतीय दलित पॅंथर महाराष्ट्र अध्यक्ष एडवोकेट रमेशभाई खंडागळे यांचा वाढदिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भाईंचा वाढदिवस त्यांच्या राहत्या घरी साजरा करण्यात आला.
यावेळी एडवोकेट रमेशभाई खंडागळे यांच्या घरी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भारतीय दलित पॅंथर चे पदाधिकारी महिला आघाडी तसेच आजी-माजी कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
यावेळी सर्वांनी भाईंना त्यांच्या या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
कार्यकर्त्यांच्या वतीने पुष्पगुच्छ हार फुले व तसेच भेटवस्तू यावेळी भाईंना कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.
सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवसानिमित्त केक कापला. त्यानंतर अल्पोहाराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी भाईंकडून आंबेडकरी चळवळी संदर्भात योग्य असे सर्वांना मार्गदर्शन मिळाले, ज्यामध्ये एडवोकेट भाईरमेश खंडागळे यांनी सर्व कार्यकर्त्यांना व उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी यांना मोलाचे मार्गदर्शन देऊन त्यांना आपल्याला भारतीय दलित पॅंथर या संघटनेची चांगल्या प्रकारे जबाबदारी समजून गोरगरीब अन्यायग्रस्त लोकांना आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना योग्य अशी मदत व त्यांना शक्य होईल तशी मदत आपल्या सर्वांना करायची आहे व त्यांना न्याय द्यायचा आहे असे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्यातून तसेच वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून कार्यकर्ते व पदाधिकारी आले होते ज्यामध्ये
एड शिवाजीअण्णा आदमाने महाराष्ट्र उपाध्यक्ष, ओमपाल चावरिया महाराष्ट्र सचिव, औरंगाबाद पूर्व जिल्हाध्यक्ष नितेशभाऊ तांगडे, अनिल अलकुंटे, कानिफ कुलकर्णी, अरूण धसींग, कडूबा म्हस्के जिल्हा कार्याध्यक्ष, रवी दाभाडे युवा शहराध्यक्ष पश्चिम, धम्मपाल तुपे शहराध्यक्ष पश्चिम, विजय दाभाडे, जिल्हा सचिव विशाल चावरिया, पश्चिम जिल्हाध्यक्ष गणेश चव्हाण, पश्चिम संघटक किरण आरके, कन्नड तालुका संयोजक अमोल शेजवळ, एड. विजय जाधव, एड. शेषराव इंगळे, रामदास मगरे, बनसोडे सर, एकनाथ त्रिभुवन अण्णा, संतोष खिल्लारे, सिद्धार्थ ताजने, जिल्हा सरचिटणीस सुरेश खाडवे, बी के जाधव, एड. दिशा खंडाळे, महिला आघाडी अध्यक्षा शोभाताई पद्मने, शहराध्यक्ष उषाताई खंडाळे, रेखा भुइगळ, जिल्हा सचिव सपना आरके, दुर्गाबाई गायकवाड, रेखा आराक, सुनिता चंदनशिवे, अनिता काळे, शारदा लहाने, देविदास वाघमारे, एड.दिलीप नवगिरे जिल्ह सचिव, ज्योतीताई जाधव , समाधान धांडे, प्रा.भगवान धांडे, शरद शिंदे शहर संघटक, संजय साबळे यांच्यासह अनेक सदस्य हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..
जयभीम
- किरण आरके
0 Comments