1) उस्मानपुरा भागातील भाजीवाली बाई चौकात रमाई आंबेडकर यांचे स्मारक उभारावे असे सर्वानुमते ठरले.
2) विभागीय आयुक्त यांना सोमवार,दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेला निवेदन देणार,
3) भाजीवाली बाई चा पुतळा काढून तिथे माता रमाई चा पुतळा बसवला पाहिजे, अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात येणार आहे.
मराठवाड्यातील आंबेडकरी चळवळीची सुरुवात 1932 ला उस्मानपुरा भागातील भीमपुऱ्या मध्ये झाली होती. त्या मुळे भाजीवाली बाई चौकात स्मारक उभारावे असे मत तरुणांनी व्यक्त केले.
सदर बैठकीला आंबेडकरी चळवळीतील शेकडो नेते कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments