छत्रपती संभाजीनगर : येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा पंधरवड्यात मराठी भाषा, वाङ्मय विभाग व आजीवन शिक्षण विस्तार विभाग आयोजित विविध उपक्रम घेण्यात आले.
यात निबंध स्पर्धा, वक्तृत्व ऐन वेळचे भाषण , गीत गायन,काव्य वाचन , सुंदर हस्ताक्षर स्पर्धा अशा विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
दि.30 जानेवारी 2024 रोजी महात्मा गांधी पुण्यतिथी अर्थात हुतात्मा दिनी अभिवादन करत वरील उपक्रमाचा समारोप करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. व्ही. के.खिल्लारे यांनी विद्यार्थ्यांना भाषेचे महत्व सांगत वेगवेगळ्या भाषा आत्मसात करत वक्तृत्व कौशल्य विकसित करण्या बाबत मार्गदर्शन केले.
प्रारंभी उपप्राचार्य प्रा एन.एम.करडे यांनी राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती देत प्रास्ताविक केले. यावेळी पालि विभागाचे डाॅ. समाधान वाघमारे व हिंदी विभाग प्रमुख डाॅ. सतीश वाघमारे यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात मंगेश इंगळे , आदित्य इंगळे , सुहानी खंडारे , भाग्यश्री निंबाळकर , वैभव म्हस्के यांनी स्पर्धेबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयाचे अधिक्षक श्री.राजू पट्टेकर यांची विशेष उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन डाॅ.नवनाथ गोरे यांनी तर आभार वैभव म्हस्के यांनी व्यक्त केले.
0 Comments