तुमची आयबहीण
आजही विटंबली जाते हाटाहाटातुन
मवल्यासारखे माजलेले
उन्मत निरो
आजही मेणबत्तीसारखी जाळतात माणसे चौकाचौकातून
कोरभर भाकरी, पसाभर पाणी यांचा
अट्टाहास केलाच तर फिरवला जातो नांगर
आजही घरादारावरून
चिंदकातले हात सळसळलेच तर
छाटले जातात
आजही नगरानगरातून
रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो
किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी ?
मरेपर्यत राह्येचे का असेच युध्दकैदी ?
ती पहा रे ती पहा, मातीची अस्मिता अभाळभर झालीय्
माझ्याही आत्म्याने झिंदाबादची गर्जना केलीय्
रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो
आता या शहरा शहराला आग लावीत चला!
- पद्मश्री नामदेव ढसाळ
#jaibhim #writersofindia #PantherProud #PantherNation #PantherPride #DPI
महाकवी , क्रांती घडवणारी लेखनी करणारे , पद्मश्री
दलित पँथर चे संस्थापक मा.नामदेव ढसाळ यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन ..!!
💐💐💐
0 Comments