छत्रपती संभाजीनगर : येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात झालेल्या राज्यस्तरीय जयभीम वादविवाद स्पर्धेत माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाच्या संघाने चांदीच्या आकर्षक ढालीसह रोख रू.पाच हजारचे सांघिक पारितोषिक पटकावले.
"सत्तेसाठी संवैधानिक संस्थांचा गैरवापर होत आहे/नाही" असा वादविवादासाठी विषय देण्यात आला होता.
प्रारंभी स्पर्धेबाबत प्रास्ताविक संयोजक डाॅ.नवनाथ गोरे यांनी केले. स्पर्धेच्या नियमाबाबत डाॅ. संघरत्न गवई यांनी माहिती दिली. आदित्य दराडे व ऐश्वर्या तनपुरे या मा.प. विधी महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत जयभीम ढाल काबीज केली. तर प्रशिक अंभोरे व शुभम नवगिरे या मिलिंद कला महाविद्यालयाच्या संघाने रू.तीन हजार सह दुसरे पारितोषिक पटकावले. तिसरे पारितोषिक रू.दोन हजारसह सृजनी खराटे व आदित्य इंगळे या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संघाने मिळविले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे प्रा. शशांक सोनवणे , ॲड. अभय टाकसाळ, मुक्त पत्रकार आरती श्यामल जोशी यांनी काम पाहिले. स्पर्धकांना विषयज्ञान , उदाहरणे , मसुदा , विवेचन, देहबोली व भाषाशैली याविषयासह सामाजिक भान , समकालीन वास्तवाविषयी ॲड. टाकसाळ व आरती जोशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डाॅ.सुरेश चौथाईवाले यांची खामगाव बुलढाणा येथे होणाऱ्या साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.स्पर्धेचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. व्ही. के. खिल्लारे यांनी केला.
यावेळी डाॅ.जी.डी.आढे , महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक डाॅ. बी.एन. शिंदे , प्रा.एस.पी. खिल्लारे, डाॅ. व्ही. जी. पिंगळे , प्रा. एस.पी. बुधवंत, प्रा. अनिता वेंकेश्वर , प्रा. छाया परदेशीसह प्राध्यापक वृंद उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी डाॅ. राजीव वानखेडे, डाॅ. सतीश वाघमारे, डाॅ.मिलिंदराज बुक्तरे, डाॅ. किरण कांबळे, डाॅ.विनोद अंभोरे,डाॅ. वैजनाथ सुर्यवंशी, डाॅ. ज्योती केदारे,डाॅ. पूजा वडमारे, डाॅ.नितीन गायकवाड, डाॅ.वनमाला लोखंडे,डाॅ. तेजश्री चंदनशिवे,डाॅ. रेश्मा गरड , डाॅ. अशोक केवटे,डाॅ.यशवंत सुरवसे , डाॅ. विजय आडे, यांनी परिश्रम घेतले . स्पर्धेचे सूत्रसंचालन डाॅ. प्रज्ञा रुईकर साळवे यांनी तर आभार उपप्राचार्य प्रा एन.एम.करडे यांनी व्यक्त केले.
0 Comments