छत्रपती संभाजीनगर मधील आंबेडकरी तरुणांनी सुभेदारी गेस्ट हाऊस ला बैठक घेऊन, रमाई आंबेडकर यांच्या स्मारक संदर्भात ठराव पारित केला.
उस्मानपुरा भागातील भाजीवाला बाई चौकात रमाई आंबेडकर यांचे "स्मारक" उभारावे असे सर्वानुमते ठरले.
आंबेडकरी चळवळीची सुरुवात 1932 ला ज्या भीमपुरा उस्मानपुऱ्यातून झाली त्याच्या जवळील चौकात रमाईचे भव्य स्मारक उभारावे असे आंबेडकरी तरुणांनी ठरवले आहे.
येणाऱ्या 7 फेब्रुवारीला रमाई आंबेडकर यांची जयंती आहे त्या निमित्ताने भाजीवालाबाई चौकात सायंकाळी हजारोच्या संख्येने रमाई आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जमावे असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
सदर बैठकीला आंबेडकरी चळवळीतील महिला व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments