खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

सामाजिक सुधारणा व विकासाचा पाया थोर मातांनीच घातला

छत्रपती संभाजीनगर : सामाजिक सुधारणा व जगाच्या, देशाच्या तसेच समाजाला कुटुंबाच्या जडणघडणीचा पाया थोर मातांनीच घातल्याचा सूर - जिजाऊ, सावित्री व रमाई व्याख्यानमालेतून निघाला.

               डाॅ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात तीन दिवस झालेल्या " राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व माता रमाई " व्याख्यानमालेचे प्रास्ताविक प्राचार्य डाॅ. व्ही. के . खिल्लारे यांनी केले. 

व्याख्यानमालेच्या उद्घाटक शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. रोहिणी कुलकर्णी-पांढरे म्हणाल्या, " संबंध महाराष्ट्रच नव्हे तर आधुनिक भारत हा राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई व रमाईचे देणे लागतो कारण त्यांचा केवळ त्यागच नाही तर कार्य कर्तृत्वाने आधुनिक समाज व राष्ट्र उजळून निघाले आहे. राजमाता जिजाऊंच्या कार्य कर्तृत्वावर प्रारंभीच डाॅ. सविता नागेश पाटील यांनी प्रकाश टाकतांना स्वराज्य , छत्रपती शिवराय व महाराष्ट्राच्या संपन्नतेत , शौर्यात जिजाऊंचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.दुसऱ्या व्याख्यानात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समकालीन सामाजिक धार्मिक स्थितीगतीचे विवेचन त्या संघर्षातून समताधिष्ठीत समाज रचनेचे कार्य, दिलेला अलौकिक लढा याची माहिती डाॅ. विद्या इंगोले यांनी दिली.तर एमजीएम विद्यापीठातील डाॅ.अनिता फुलवाडे यांनी मातोश्री रमाबाईत आंबेडकर यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात, चळवळीत तसेच त्यांना संघर्षमय जीवनात दिलेली साथ ही एक आदर्श सहजीवनाचे प्रेरणास्थान असल्याचे स्पष्ट केले.तिन्ही दिवसाच्या व्याख्यानासाठी प्रा. ए.एम.वेंकेश्वर, प्रा. छाया परदेशी बाथम , डाॅ. शारदा बुधवंत यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर व्याख्यानमालेच्या नियोजनात व संयोजनात उपप्राचार्य प्रा एन.एम.करडे व डाॅ. प्रज्ञा रूईकर साळवे यांनी केले. समारोप समारंभासाठी पीईएसचे सहसचिव माजी प्राचार्य डाॅ. किशोर साळवे यांनी व्याख्यानमालेचे वेगळेपण स्पष्ट केले.

कार्यक्रमासाठी डाॅ. बी.एन. शिंदे, डाॅ. जी.डी.आढे,डाॅ. आर.व्ही. मस्के, प्रा. एस.पी.खिल्लारे,डाॅ.व्ही.जी.पिंगळे , डाॅ. नवनाथ गोरे , कार्यालयीन अधिक्षक राजू पट्टेकर, यांच्यासह डाॅ.ज्योती केदारे , डाॅ.वनमाला लोखंडे,डाॅ. रत्नमाला पगारे, कु.पल्लवी कांबळे, कु.दिपाली सांगडे ,डाॅ. आरती पांडे ,डाॅ. तेजश्री चंदनशिवे यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools