छ संभाजीनगर औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंती निमित्त नंदनवन कॉलनी येथे छत्रपती शिवराय मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्रीरंग आमटे पाटील यांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले.
उपशहरप्रमुख हिरालाल सलामपुरे, मा.नगरसेवक सचिन खैरे, महिला शाखासंघटक मीना यादव, अजय यादव, शिवहरी लग्गड, युवासेना मध्य उपशहरप्रमुख अजय रेड्डी, शाखाप्रमुख जोसेफ पाटोळे, राजेश रानडे, उपशाखप्रमुख सुरेश भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी सुमित लखन, अखिल गायकवाड, दिनकरराव देशमुख, उपशाखाप्रमुख योगेश लग्गड, ज्ञानेश्र्वर मते, राजु लोखंडे, गौरव खरात, प्रीतम अर्नाजलम, रुख्मिनीकांत कुलकर्णी, वसंत पंडीत, सूरज जाधव, मिलिंद सोनटक्के, रोशन साबळे, श्रावण हिरे व शेख शब्बीर आदीं नंदनवन कॉलनीतील नागरिकांची उपस्थिती होती.
0 Comments