नामदेव ची कविता सर्वांना माहित आहे. पण नामदेव आपल्या कार्यकर्त्यांकडून कोणत्या अपेक्षा ठेवत होता?
30 वर्षा पेक्षा अधिक नामदेव चे मित्र , कार्यकर्ता , सहकारी असलेले सुरेश केदारे यांना नामदेव यांनी पुस्तकावर लिहलेला संदेश .
प्रिय सुरेश
छान ज्ञानाच्या नादी लागणे परंतु अर्धवट ज्ञान हे ठार अडाणी असण्या पेक्षा वाईट .ज्ञानासाठी हजारो जन्म अपुरे असतात!
जे ज्ञानाचा दंभ जोपासतात त्यांचे ज्ञान समाजासाठी उपयोगी नसते- असली ज्ञानी माणसे मग कटकारस्थानात आपली ज्ञान प्रतिभा खर्ची घालतात. त्यातून अमानुषतां जन्म घेते. असला ज्ञानी असल्याचा धिक्कार करायला शिक
खरे ज्ञान स्:वताकडे आणि समष्टीकडे स्वच्छ पाहायला शिकवते . आपला मनुष्स्वभाव , भातृभाव खरे ज्ञान विकसित करते.
ज्ञानी माणूस वैगुण्यावर बोट ठेवून माणसांची कधीच टिंगल टवाळी करत नाही.
असले ज्ञान नाकारून खऱ्या ज्ञानाचा मार्ग तू अवलंबावेस!
तुझा
नामदेव ढसाळ .
0 Comments