खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार; संघटनहेच आमचे शस्त्र  :  अ‍ॅड. रमेशभाई खंडागळे

भारतीय दलित पँथर संघर्ष मेळावा
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार; संघटन
हेच आमचे शस्त्र  :  अ‍ॅड. रमेशभाई खंडागळे 

पँथर ही लढावू आणि धाडसी संघटना आहे. चळवळीचे शकले पडू देवू नये: डॉ. ऋषिकेश कांबळे
  

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि संघटन हेच आमचे शस्त्र असल्याचे प्रतिपादन भारतीय दलित पँथर नेते अ‍ॅड. रमेशभाई खंडागळे यांनी केले. भारतीय दलित पँथरच्यावतीने चवदार तळे सत्याग्रह  दिनी संघर्ष  मेळावा कासार समाज सभागृह हडको येथे आयोजीत करण्यात आला होता. 

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. भगवान धांडे हे हाते तर उद्घाटक म्हणून डॉ.ऋषिकेश कांबळे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणूने अ‍ॅड. शिवाजी आदमाने, संजयभाऊ कांबळे यांची उपस्थिती होती. 

ओमपाल चावरिया, रामदास मगरे, प्रा. समाधान धांडे, नामदेवराव पद्मणे, सुरेश खाडवे, अशोध धनेधर, सतोष खिल्लारे, राष्ट्रपाल तूपे शोभाताई पद्मणे, ज्योतीताई जाधव, सभद्रा नवगिरे, सपना आरके यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना खंडागळे म्हणोले की, आजही डॉ. बाबासाहेबांच्या नावाला विरोध होत आहे, देशात दलितांवर अत्याचार होत आहे, सत्ताधार्‍यांकडून संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. असे असतांना आमचा एकही नेता यावर बोलायला तयार नाही  तेंव्हा आमचा लढा हा आम्हालाच लढावा लागणार आहे.  आमचा एकच नेता आहे तो म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा विचार हाच आमचा नेता आहे. आणि आमचे संघटन हेच आमचे शस्त्र आहे. चवदार तळे सत्याग्रह दिन हा संघर्ष आम्ही पुन्हा प्रज्वलीत करित आहोत. शेवटच्या श्‍वासापर्यंत  हा संघर्ष तेवत ठेवू असा निर्धार यावेळी अ‍ॅड. रमेशभाई खंडागळे यांनी केला.

उद्घाटन करतांना डॉ. ऋषिकेश कांबळे म्हणाले की, पँथर ही लढावू आणि धाडसी संघटना आहे. चळवळीचे शकले पडू देवू नये. पँथरने अनेक कार्यकर्ते घडविले आहेत. पँथर पुन्हा उभी राहिली पाहिजे असे डॉ. ऋषिकेश कांबळे म्हणाले. 


यावेळी शिवाजी आदमाने यांनी मराठा आरक्षण आंदोलन भरकटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतल्याशिवय आरक्षण मिळणार नसल्याचे त्यांनी सांगीतले. संजय भाऊ कांबळे (लातूर),  दिपक जाधव, ओमपाल चावरिया, नामदेव पद्मणे (नांदेड), सिद्धार्थ नरवडे, ज्ञानेश्‍वर खंदारे, ओमपाल चावरिया, सुरेश मगरे, समाधान धांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षयी समारोप डॉ. भगवान धांडे यांनी केला. 


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश खाडवे यांनी केले तर आभार संतोष खिल्लारे यांनी मानले. 


मेळावा यशस्वी करण्यासाठी रतनभाई खंडागळे,  
संयोजक: नितेष तांगड, कडूबा म्हस्के , गणेश चव्हाण  ,  किरण आरके , बी.के.जाधव, श्रीकांत भोसले, अजय बोर्डे, अनिल हातागळे, अनील अलकुंटे, राजकुमार कांबळे, दगडू खंडाळे, अनिल जाधव 

औरंगाबाद :  आकाश ढिलपे ,विलास उगले, अ‍ॅड. दिलीप नवगीरे, देवदास वाघमारे, विशाल चावरीया, रामेश्वर ससाने, रोहीत साळवे, विकास निकाळजे, दिनकर मगर, दयानंद दांडगे, सिद्धार्थ ताजणे, अशोक हिवराळे, साईनाथ जंगम, अ‍ॅड. हर्षवर्धन प्रधान, सार्थक खंडाळे, सुनीता चंदनशिवे, अ‍ॅड. दिशा खंडाळे, अनीता काळे, शारदा लहाने, अनिता त्रिभूवन, रेखा भुईगळ, रेखा आरक, विमलताई ठोके, वनिता खंडाळे, सिताबाई जाधव, संगीता गडवे, राहुल पाईकडे, रोहीत पाईकडे, आशोक तांदळे, करण गायकवाड, सारंग ओंकार, मनोज मोहतोळे,  

फुलंब्री : भगवान गंगावणे, रणजीत वाहुळ, मंगेश गुंजाळ, काकासाहेब पाचवणे, संदिप साळवे.  

पंढरपूर : सुभाष मोरे. वैजापूर:  राजेंद्र जगताप, आण्णा पठारे  गंगापूर :  सिद्धार्थ नरवडे , गौतम नरवडे , सुभाष पठारे, प्रकाश साळवे,  

औरंगाबाद( प) : भगवान बनकर, बालाजी कांबळे, गौतम इंगळे, संतोष वानखेडे, शरद शिंदे  

खुलताबाद: सुभाष गायकवाड  

पंढरपूर : सुभाष मोरे , कन्नड : विश्वनाथ जाधव  पै

ठण:  सुनिल रामू चव्हाण, गोरख शरणागत आदींनी परिश्रम घेतले.


बातमी सौजन्य - रतनभाई खंडागळे (युवा पँथर प्रमुख नेते) 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools