पुणे शहरातील मंगळवार पेठ याठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मध्ये रूद्रांश फाऊंडेशन तर्फे आयोजित कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना विभागप्रमुख (ठाकरे गट) दादासाहेब लोखंडे यांना "महाराष्ट्ररत्न" या पुरस्काराने गौरविण्यात आले.
रूद्रांश फाऊंडेशन तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याचा गौरव सोहळा आयोजित करण्यात येतो.
या वर्षाचा मनुष्यबळ,कामगार व्यवस्थापन,रोजगार निर्मिती आणि सामाजिक क्षेत्रात बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल छ.संभाजीनगरचे दादासाहेब लोखंडे यांना कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असलेले पुणे म.न.पा.माजी अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्र्वर मोळक, उपआयुक्त युनूस पठाण आणि प्रमुख कार्यवाहक तथा बुद्ध धम्म व इतिहास अभ्यासक जयदेव जाधव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास पुणे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन मराठी उदयोन्मुख अभिनेत्री कोमल सावंत यांनी केले.
या मिळालेल्या पुरस्कारासाठी दादासाहेब लोखंडे यांच्यावर शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, मित्रपरिवार व आप्तेष्ट यांच्यातर्फे कौतुकाचा वर्षाव होत आहे.
0 Comments