खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

तळे राखणारा संक्षिप्त असा लेख - हंसराज कांबळे

तळे राखणारा.
 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जरी आपल्या मधून कायेने गेले असतील तरी पण त्यांनी लिहिलेली लिखित पुस्तके आणी खंड आपणा सर्वाना योग्य मार्गदर्शक आणी दिशादर्शक अशी आहेतच. 

वैचारिक पुस्तकांबद्दल आणी स्वतः बद्दल ते काय म्हणतात ते पहा - 

माझ्या विद्येचे वेड भयंकर आहे. ब्राह्मणाच्या घरी नाही इतकी पुस्तके आता दिल्लीला मजजवळ आहेत. एकूण 20,000 पुस्तके मजजवळ आहेत कुणाबरोबर दाखवून द्यावीत. एवढे जेव्हा पुस्तकावर प्रेम होईल तेव्हाच तो विद्येचा खरा पुजारी होईल. मी विद्येची पूजा 24 तास करतो
*संदर्भ -* खंड. 18 भाग 3 पृष्ठ. क्रं. 403.  

पुढे ते म्हणतात - 

साधारणपणे पुस्तक वाचन व माझे काम या पलीकडे माझे मन दुसरे कशातही रमत नसल्यामुळे मी फारसा कोणत्याच कार्यक्रमात भाग घेत नाही
*संदर्भ -* उपरोक्त. पृष्ठ. क्रं. 197.पैरा - 3. 

उपरोक्त दोन्ही संदर्भानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विद्येचे किती व्यासंगी होते. म्हणूनच त्यांना आपण धर्मशास्त्रवेत्ता, घटनेचे शिल्पकार विद्येचा महामेरू आणी ज्ञानाचे प्रतीक या नावाने उपाधी लावून सर्वजण संबोधतो. त्यांनी एकदा आपल्या भाषणात बौद्धजणांना संबोधन म्हटले होते की, जो कोणी माझा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला तर तो अपुरा होईल आणी समाजातील लोकांना आपण माझ्यासारखे उच्च शिक्षण घेऊन विद्वान व्हायला पाहिजे. त्यांची इच्छा, आकांक्षा आणि मनीषा काय होती ते पहा - 

माझ्या सारखा विद्वान भारतात पाहू इच्छितो
*संदर्भ -* उपरोक्त.पृष्ठ. क्रं. 458.  

शिक्षित व्हा, चळवळ करा ( लढा उभारा ) संघटित व्हा
*संदर्भ -* खंड. 18 भाग - 2.पृष्ठ. क्रं. 422. ह्यात आपल्या समाजातील बौद्ध अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे सवलती मुळे उच्चशिक्षित झाले, शासकीय नोकऱ्या मिळाल्या, गलेलठ्ठ पगार मिळतो पण माझे कुटुंब आणी मी ह्यातच मदमस्त जिंदगी जगत आहो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या चळवळीचा रथ आणी त्यांची चळवळ पुढे नेण्यास सामोरे येत नाही. (अपवादात्मक सोडता ) ही फार मोठी शोकांतिका आहे , शोचनीय बाब आहे.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी त्यांच्या ह्यातीत समाजातील लोकांना उद्देशून म्हटले होते की, मी एवढी विद्या संपादन केली आहे.मी सुखाने जीवन जगू शकतो. पण तुमच्या परिस्थितीकडे पाहून मला आपली कीव येते. ही जाणीव ठेवून मी आपली गुलामीच्या बंधनातून मुक्तता केली नाही तर मला दिव्याच्या खांबावर फाशी द्यावी. मी स्वीकारण्यास तयार आहे. एवढी उदारता कोणी तरी होऊन गेलेल्या महामानवांनी दाखवली आहे काय? याचे उत्तर नाही असेच येईल. एखादी नोकरी करून मी सुखी राहू शकतो याबद्दल त्यांचे मत त्यांच्या लिखित पुस्तकातून जाणून घेऊ या ते म्हणतात - 

एखादी प्रोफेसरची नोकरी पत्करून पुस्तके वाचण्यात सुखाने काळ काढवा अशी माझी पहिली इच्छा होती.
*संदर्भ -* खंड. 18 भाग - 1 पृष्ठ. क्रं. 403 पैरा - 1.वाचा. 

एकीकडे त्यांना गुलामगिरीत खितपत पडून असलेला आपला समाज, आणि दुसरीकडे पैसाचे अभावी कौटुंबिक जबाबदारी ह्याच कचाटयात सापडून स्वहिताला दूर सारून समाजहित आणी देशहित हा दूरदृष्टीपणा ठेऊन पूर्वीच्या परिस्थितीची आठवण करून देताना ते म्हणतात - 
तूमची खरी स्थिती काय आहे? याची तुमच्याच हाडामासाची मला पूर्ण जाणीव आहे. आठवड्यातून तीन दिवस पोटभर अन्न मिळण्याची तुम्हाला मारामार, अंगावर एखादा फटका सदरा, एक लंगोटी ती देखील लवकर बदलता येत नाही अशी तुमची कंगाल.
*संदर्भ -* खंड. 18 भाग - 1.पृष्ठ. क्रं. 453. 

आज आपली आर्थिक परिस्थिती सुधारली आहे.ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे आपली उन्नती झाली आहे. तेच आपले मार्गदर्शक, संरक्षक आणी पालक आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेमुळे आपण मोकळा श्वास घेत आहो. त्यांच्या तत्त्वज्ञानात बंधुतेस फार उच्च स्थान आहे ह्यात मानवता बाबत ते म्हणतात - 

स्वातंत्र्य नि समता यांच्याविरुद्ध स्वरक्षक फक्त बंधू भावानेच आहे. त्याचे दुसरे नाव बंधुता किंवा मानवता आणि मानवता हीच धर्माचे दुसरे नाव आहे.
*संदर्भ -* डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र. लेखक - धनंजय किर. पृष्ठ. क्रं. 508 - 509.पैरा - शेवटचा - पहिला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत त्यावेळेस अज्ञानी लोक साथीला होती. माझा समाज हा मेंढरे आहेत मी त्याचा पालक आहे याच नीतिमत्तेच्या भरोशावर त्यांनी संघर्षमय लढाई जिंकली. चळवळीतल्या स्वाभिमानी अज्ञानी साथीदार लोकांना त्यावेळेस ते काय संबोधून म्हणाले होते ते पहा - 
माझ्या मागे तुम्हा लोकांच्या अभेद्य ऐक्याचे कवच आहे. त्यानेच मला बळकटी आली आहे. म्हणून तुम्ही आपसात भांडू नका. माना पानासाठी चढाओढ करून एकमेकांत बेकी करू नका
*संदर्भ -* खंड. 18 भाग - 2.पृष्ठ. क्रं. 311.पैरा - शेवटचा. जनता वृत्तपत्र - 20 जाने 1940. 

पुढे ते समाजातील माणसांना माझ्या निघून जाण्याने समाजात दुही व पोकळी निर्माण होणार नाही याची समाजातील पुढारी लोकांनी काळजी वाहावी मानापनासाठी रुसू नये, स्वाभिमानाने जीवन जगून आपला उद्धार करून घ्यावा ही मार्गदर्शक तत्वे त्यांनी आपणास दिली होती. पण आजचे आपले पुढारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना तिलांजली देऊन अमिषापोटी तोंडाला मुसके बांधून मुंग गिळून बसून आहेत. त्यांच्या कार्याप्रती, चळवळीप्रती त्यांच्यात कार्यशून्यात आहे. त्यांनी दूरदृष्टीपणा ठेवून जनतेला उद्देशून पुढार्‍याबद्दल काय मत व्यक्त केले होते ते त्यांच्या शब्दात पहा - 

जगात फुकट्याला काही मानसन्मान मिळत नाही. ही गोष्ट ही विसरू नका. समाज कार्यासाठी पैसे जमवतात व ते क्वचित प्रसंगी खाण्यातही येतात. ही गोष्ट मला माहित आहे. तरी एवढ्यासाठी समाजकार्य थांबवता येणार नाही. तळे राखणारा पाणी चाखतो. त्याचा आपण बंदोबस्त केला पाहिजे. पण आपण याबाबतीत व्यवहारिक दृष्टी ठेवली पाहिजे
*संदर्भ -* खंड. 18 भाग - 2.पृष्ठ. क्रं. 311 - 312.पैरा - शेवटचा - पहिला. 

उपरोक्त संदर्भानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी त्यांच्या ह्यातीत समाजातील पुढार्‍याबद्दल आणी त्यांच्या सहकार्याबद्दल केलेले वक्तव्य आजही तंतोतंत खरे ठरत आहे. हे सुज्ञ, स्वाभिमानी समाज बांधवांनी आपल्या सदविवेक बुद्धीला स्मरून तळे राखणारा पाणी चाखतो, त्याचा आपण बंदोबस्त केला पाहिजे, याच त्यांच्या तत्त्वानुसार आमची स्वाभिमानी संघटना कृतीतून कार्य करण्याकरिता येत्या 1 जुलैला दीक्षाभूमी नागपूर येथे संबंधित प्रशासन अधिकारी ह्यांना न्यायिक मार्गाने निवेदन देऊन स्मारक समिती सोबतच दीक्षाभूमी या नावाचा उल्लेख करून भूमिगत होत असलेले बांधकाम रोखण्यात यावे असे लेखी निवेदन देणार आहोत. इच्छुक, नीतीमत्ता आणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी स्वाभिमान असलेल्या बौद्ध समाजातील बांधवांनी आमच्या संघटनेस पाठिंबा द्यावा ह्यात मी आभारी आहो, धन्यवाद हा शब्दप्रयोग करीत नसून बौद्ध समाजातील अनुयायांचे ते कर्तव्य समजावे. 

तूर्तास एवढेच ! 
सप्रेम जयभिम ! 
जय संविधान ! 

दि. 23 जून 24.

हंसराज कांबळे ✍️
8626021520
नागपूर

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools