भाऊ फाऊंडेशन पँथर्स वतीने संस्थापक दिपकभाऊ हिवाळे यांच्या आदेशाने शासकीय ग्रामीण रुग्णालय वैद्यकिय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे नमूद केले की ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना वेठीस धरले जाते तसेच रुग्णालय येथे नियमित स्वच्छता नसते.
तसेच जे रुग्ण येथे येतात त्यांच्या सोबत येथील कर्मचारी हे झिडकारून बोलतात जे की चुकीचे आहे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी या अशा गोष्टींकडे लक्ष घातले पाहिजे आणि कर्मचारी यांना तंबी दिली पाहिजे.
या वेळी अनिलभाऊ पगारे, शाकेर भाई, समिर सुल्तान, ज़ावेद भाई, बाबा भाई, जाहेद पहेलवान व भाऊ फाऊंडेशन महाराष्ट्र तथा आम आदमी पार्टी चे कार्यकर्ता मोठ्या संखेने उपस्थित होते.
0 Comments