छ. संभाजी नगर- पालकमंत्री ना.मा.अब्दुलजी सत्तार साहेब यांची भेट घेऊन, सामजिक संघटना भीमशक्ती व शिक्षणं महर्षी माधवराव बोरडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने निवेदन देण्यात आले .
अजंठा येथे होत असलेल्या शिव स्मारक, व भीम स्मारक, या धर्तीवर छ.शाहु महाराज यांच्या महान कार्याचा गौरव म्हणुन संभाजी नगर मधे किमान 50 एकर मधे शाहु स्मारक उभारण्यात यावे.
त्याच प्रमाणे विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्यूकेशन सोसायटी च्या जागेवर झालेले अतिक्रमणं हटवून शासनाने सदरील जागेची मोफत मोजणी करून संरक्षण भिंत उभारून द्यावी. या महत्त्व पूर्ण मागण्याचे निवेदन देण्यात आले.
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी हा विषय येणाऱ्या DPTC बैठकीत मांडून मागणी पूर्ण करू असे आश्वासन दिले.
या वेळी भिमशक्तीचे महानगर प्रमुख तथा शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे प्रतिष्ठानचे सचिव मिलींद दाभाडे, प्रतिष्ठानचे कार्यध्यक्ष ॲड. धनंजय बोरडे ( मुन्ना भाऊ) डॉ.रियाज शेख, अफसर शेख, ॲड. अमोल घोबले, उमेशअण्णा चौधरी, राजु भालेराव, विजय घोडे, शेख अजीज, इत्यादी उपस्थित होते.
0 Comments