खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त घटना ही संतापजनक, मनाला वेदना देणारी या घटनेचा निषेध करण्यासाठी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुक आंदोलन

*राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी साधला माध्यमांशी संवाद*
................
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त घटना ही संतापजनक, मनाला वेदना देणारी या घटनेचा निषेध करण्यासाठी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुक आंदोलन.
...............
*विरोधकांसह महायुतीतल्या नेत्यांनाही भावना दुखावतील असे वक्तव्य करु नये तसेच या प्रकरणाचे राजकारण करु नये !*
.................
*शासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी, ही कारवाई शब्दातुन नाही तर कृतीतून महाराष्ट्रातील जनतेला दिसायला हवी !*
................
*युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त ठिकाणी तत्काळ पुन्हा उभारायला हवा !*

ठाणे ౹ प्रतिनिधी

*मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त घटना संतापजनक आणि मनाला वेदना देणारी आहे. 

महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये संतापाची लाट या घटनेमुळे पसरली आहे. 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री तसेच गृहखाते सांभाळणारे देवेंद्रजी फफडणवीस या दोन्ही नेत्यांना विनंती आहे की, या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेले शिल्पकार, कन्सल्टन्ट, कंत्राटदार, सरकारी पीडब्लूडीचे अधिकारी या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी आणि ही कारवाई शब्दातून नाही तर कृतीतून महाराष्ट्रातील जनतेला दिसायला हवी. तसेच लवकरात लवकर तिधे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा उभारायला हवा, हे काम महायुतीने त्वरित करायला हवे.

 कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची या घडलेल्या घटनेबद्दल जाहीर माफी मागितली आहे. आम्ही जरी सत्तेत असलो तरी झालेल्या दुर्देवी घटना ही संतापजनक आहे. यामुळे ठाण्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ जाहीर मूक आंदोलन केले. असे मत माध्यमांशी संवाद साधताना प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.*

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचाराच्या घटना झाल्या त्याचीही जाहीर वाच्यता संजय राऊत यांनी करावी. युगपुरुष, छत्रपती शिवाजीमहाराज यांचा विषय हा राजकारणाचा असूच शकत नाही. छत्रपती शिवाजीमहाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा, गौरवाचा विषय आहे. त्यामुळेच विरोधकांसह महायुतीतल्या नेत्यांनाही विनंती आहे की महाराष्ट्राील शिवप्रेमी, महाराष्ट्राची जनता छत्रपती शिवाजीमहाराज यांना अराध्यदैवत मानते. यामुळेच त्यांच्या भावना दुखावतील असे कुठलेही वक्तव्य कोणीही करु नये आणि या प्रकरणाचे राजकारणही करु नये. 
जनतेची हीच इच्छा आहे की राजकारण करण्यापेक्षा दोषींवर तत्काळ कडक कारवाई व्हावी आणि पुन्हा एकदा युगपुरुष, छत्रपती शिवाजीमहाराज यांचा भव्य पुतळा त्याच ठिकाणी उभारण्यात यावा. बदलापूर येथील घडलेली घटना संवेदनशील आहे. 

लहान बालिकांबरोबर जे दुष्कृत्य झाले याप्रकरणी एसआयटीची कारवाई सुरु आहे. मालवण येथील राजकोटची पुतळ्याची जी दुर्दैवी घटना घडली, त्या दोन्ही घटनांकडे महायुतीचे शासन अत्यंत संवेदनशीलपणे बघत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राजकोट घटनेची सातत्याने माहिती घेत आहेत येथे प्रत्यक्ष जाऊन राजकारण करण्यापेक्षा कृतीच्या माध्यमाने काम करणे अजितदादा पसंद करतात. म्हणूनच संकोच न बाळगता अजितदादांनी या दुर्दैवी घटनेबद्दल महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागितली, असे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार, प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) च्या वतीने गुरुवारी, २९ ऑगस्ट, २०२४ रोजी, सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, तलावपाळी, ठाणे येथे मूक आंदोलन करण्यात आले. 
याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष दत्ता चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, महिला अध्यक्षा वनिता गोतपागर, महिला कार्याध्यक्ष मनिषा भगत, मा. नगरसेविका वहिदा खान, अंकिता शिंदे, रुपाली गोटे, परिवहन समिती सदस्य नितीन पाटील, युवक प्रदेश पदाधिकारी आदित्य धुमाळ, युवक कार्याध्यक्ष संदेश पाटील, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष मंगेश सुर्यवंशी, अल्पसंख्यांक विभागाचे कार्याध्यक्ष रिकी मुरझेलो, आरोग्य सेल अध्यक्ष अविनाश पवार, विधानसभा अध्यक्ष अजय सकपाळ, विजय भामरे, महिला विधानसभा अध्यक्षा सुवर्णा खिल्लारी, अरुणा पेंढारे, युवती विधानसभा अध्यक्षा नेहा नाईक, सोनिया माने तसेच सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य, विधानसभा अध्यक्ष, कार्याध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, कार्याध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष तसेच सर्व फ्रंटल विभाग, सेलचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools