राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये बदलाचे वारे वाहू लागल्याने सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ शेटे यांच्या पाठीमागे तालुक्यातील सर्व सामान्य गोरगरीब दिनदलित बहुजन वर्ग उभा राहताना दिसत आहे.
गणपती उत्सवाच्या निमित्ताने तालुक्यातील राजुभाऊ शेटे यांच्या नावाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसत होती ठीकठाकांच्या आरतीसाठी राजूभाऊ शेटे यांना दिवसभरामध्ये वेळ काढणे मुश्किल झाले होते तरीही त्यांनी वेळात वेळ काढून तालुक्यातील सर्व तरुण मित्र मंडळांच्या गणपती उत्सवाला हजेरी लावून तरुणांचा आनंदात सहभागी होऊन उत्साह वाढवला.
राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात फेरफार बदल होऊन राजकीय गणिते बिघडणार असल्याने सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ शेटे यांनी गेले अनेक दिवसापासून समाजातील सर्व वर्गाला बरोबर घेऊन आमदारकीची तयारी केल्याने तालुक्यातील राजकीय पक्षांचे नेत्यांची डोकेदुखी चांगलीच वाढताना दिसत आहे.
या निवडणुकीमध्ये नवीन तरुणांस मतदान मोठ्या प्रमाणात वाढल्याने हे सर्व मतदान सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ शेटे यांच्या पारड्यात जाताना दिसत आहे.
सोशल मीडियावरती राजूभाऊ शेटे यांना मोठ्या प्रमाणात विशेषता तरुणांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे.
राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये गणपती उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते राजुभाऊ शेटे यांच्या ताकतीचा करिष्मा बघायला मिळत होता तालुक्यातील एवढे सर्व राजकीय नेते असताना तालुक्यातील गणेश मंडळांकडून आरतीसाठी राजूभाऊ शेटे यांनाच सर्व मंडळांकडून आरतीचा मान मिळताना दिसत होता.
दरम्यान विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ शेटे यांनी राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये मेळावे बैठका व तालुक्यातील सर्व गावांमध्ये जाऊन तरुणांच्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या तरुणांच्या व्यथा जाणून घेताना दिसत आहे.
0 Comments