जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर छ.संभाजीनगर मधील राजकारण चांगलंचं तापल आहे.
छ.संभाजीनगर मध्य मधील भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस अमित घनघाव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
यावेळी शिवसेना पक्षसंघटक चेतन कांबळे, उपजिल्हाप्रमुख सुधीर नाईक, सचिन झवेरी, राजू राठोड, पश्चिम तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड व युवासेना मध्य शहरअधिकारी अजय रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती
या प्रवेशानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
भाजपचे पूर्वाश्रमीचे पदाधिकारी अमित घनघाव यांनी या प्रवेशांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
भाजपचे पदाधिकारी मंगेश जाधव मंडळ उपाध्यक्ष (अनुसूचित जाती विभाग), सूरज साळवे (वार्ड अध्यक्ष, भीमनगर,भावसिंगपूरा), सामाजिक कार्यकर्ते नितीन इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरद पवार गट) अण्णासाहेब बोरगे, अभिजित घनघाव, सुमित जाधव, निशांत साळवे, अनिल पगारे, सचिन गजहंस, विजय सोनवणे, पवन खरात, राहुल तेलगोटे, सतीश दाभाडे, शिवराज सोनवणे, राज थॉमस, किरण दाभाडे व रेखा अंभोरे, आशा अंभोरे, बिजला साळवे, लक्ष्मी जाधव, शारदा भोसले यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या सामाजिक कामांना प्रभावित होऊन प्रवेश केल्याची माहिती अमित घनघाव व कार्यकर्त्यांनी दिली.
एवढ्या मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
येणाऱ्या काळात आणखी काही पक्षांचे पदाधिकारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद यांनी दिली आहे.
संभाजी नगर प्रतिनिधी - विशाल पठारे
0 Comments