भिम आर्मी चे संस्थापक आजाद समाज पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार भाई चंद्रशेखर आझाद यांनी उत्तर प्रदेश नगीना मध्ये पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात नगीना मधून दीड लाखांच्या मताधिक्य मिळवून विजयी होऊन खासदार झाल्यानंतर संबंध देशभरात चंद्रशेखर आजाद यांचा विजयाचा गुलाल उधळला गेला .
आंबेडकरी समाजामध्ये राजकीय पर्याय म्हणून बघण्याचा दृष्टीकोन झाला तसेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची हालचाल सुरू आहे भिम आर्मी चे राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंह दि ०९ पासून दिक्षा भुमी ते चैत्यभूमी सामाजिक न्याय यात्रा काढणार आहेत .
महाराष्ट्रातील अनेक विधानसभा इच्छुक उमेदवार राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंह यांच्या संपर्कात असल्याने या दौऱ्यात विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत दि ११ या रोजी लातूर या ठिकाणी मराठवाड्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत भालचंद्र ब्लड बँक या ठिकाणी सामाजिक न्याय सभा घेणार आहे.
तरी मराठवाड्यातील सर्व भिम आर्मी चे पदाधिकारी कार्यकर्ते आंबेडकरी समाजातील बांधव चळवळीतील सहकारी बांधवांनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन भिम आर्मी चे माजी महाराष्ट्र प्रदेश संघटक तथा मराठवाडा निरीक्षक अक्षय धावारे मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांनी केले आहे .
या कार्यक्रमाचे आयोजन लातूर जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे व जिल्हा कमीटी ने केले आहे या कार्यक्रमाला भिम आर्मी चे राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ कांबळे महाराष्ट्र प्रभारी अनिल धेनवालजी हे उपस्थित राहणार आहेत
सामाजिक न्याय सभा
दि ११/१०/२०२४ वेळ दुपारी १२ वाजता
स्थळ - भालचंद्र ब्लड बँक गांधी मार्केट लातूर
अक्षय धावारे मा महाराष्ट्र प्रदेश संघटक तथा मराठवाडा विभागीय निरीक्षक .
0 Comments