पूर्व विदर्भात पावसाचा जोर कमी राहणार असल्याने, या भागात १२ ते १८ ऑक्टोबर दरम्यान पाऊस होणार आहे, परंतु त्याची तीव्रता कमी असेल, असे डख यांनी स्पष्ट केले.
पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीसारख्या भागात ९ ऑक्टोबरपासून १७ ऑक्टोबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सावधगिरी बाळगावी, असे डख यांनी सुचवले आहे. त्यांनी विशेषता सोयाबीन काढणी केलेल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे, कारण मुसळधार पावसाचा इशारा मिळालेला आहे.
विशिष्ट जिल्ह्यातील संभाव्य मुसळधार पावसाबाबत बोलताना, डख यांनी नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, लातूर, बीड, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक, धुळे, आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये जास्त मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगितले.
एकंदरीत पंजाबराव डख यांच्या माहितीप्रमाणे, ९ ऑक्टोबरपासून १७ ऑक्टोबरपर्यंत पूर्व विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
0 Comments