खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

1 जानेवारी शोर्य दीनी भीम अनुयानी यांना सोयी सुविधा देण्यात यावा - मुख्यमंत्री यांना निवेदन

पुणे - १ जानेवारी शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी प्रत्येक वर्षी लाखों आंबेडकरी अनुयायी देश विदेशातून येतात त्यांना सरकारने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात 

त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी असे प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे.
भीमा-कोरेगाव (मु. पेरणे ता. हवेली, जि. पुणे येथील १ जानेवारी २०२४ रोजीच्या शौर्य दिनानिमित विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत.
प्रत्येक वर्षी १ जानेवारीला भीमा कोरगाव (पेरणे) येथे शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी देश-विदेशातून लाखों अनुयायी येतात. याही वर्षी १ जानेवारी २०२५ रोजी लाखों आंबेडकरी अनुयायी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येणार आहेत. त्यांना कोणत्याही सोयी सुविधांची कमतरता भासू नये म्हणून त्यांना खालील सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात.
१) संपूर्ण विजयस्तंभास फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात यावी.
२) पोलीस सुरक्षा व्यवस्था तसेच आंबेडकरी अनुयायांना रांगेतून सोडण्यासाठी पोलिस अथवा होमगार्ड (स्त्री-पुरुष यांची व्यवस्था करावी. 
३) पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था, स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालये, विजयस्तंभ परिसरात विद्युत रोषणाई व गर्दीचे नियंत्रण व मार्गदर्शन करण्यासाठी उंच माईकसह मनोरे, सी. सी. टिव्ही, पार्किंग व्यवस्था जयस्तंभाच्या जवळपास असणाऱ्या मोकळ्या जागेत करण्यात यावी जेणेकरून महिला, लहान बालके, अपंग व वृद्धांना सोयिस्कर पडेल.
४) भीमा-कोरेगाव विजयस्तंभाऊच्या मालकीच्या परिसरातील ३.८६ आर जागेत पुस्तकांचे स्टॉल, प्रबोधनपर साहित्य व समाजप्रबोधन करणारे स्टॉल इ. सर्व व्यवस्था मोफत करण्यात यावी.
५) भीमा-कोरेगाव विजयस्तंभ परिसरातील जागेत ठिकठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारावीत.
६) पुणे व शिक्रापूर ते पेरणे (भीमा कोरेगाव) व पेरणे (भीमा कोरेगाव) ते पुणे व शिक्रापूर (दर पाच मिनीटांनी) पुणे कॉपेरिशन परिवहन बस सेवा महाराष्ट्र राज्य परिवहन बस सेवा चालू ठेवावी. 

तरी वरील सोयी सुविधा महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोफत उपलब्ध करून देण्यात याव्यात व यासाठी शासनाने स्वतंत्र फंडाची तरतूद करावी किंवा शौर्य दिनानिमित होणारा खर्चाचा स्वतंत्र निधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) या संस्थेला अतिरिक्त देण्यात यावा ही विनंती.

– दादाभाऊ अभंग 
( भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती )

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools