खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

113 उमेदवरांना पाडणार, मनोज जरांगेचा इशारा, महायूतीच्या उमेवारांची धाकधूक वाढली

वडीग्रोदी/दै.मू.वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्टर प्रभावी ठरला. मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम असा झाला कि मराठवाड्यातून भाजपचा सुपडासाफ झाला. आता अशाच प्रकारचा इशारा मराठा आंदोलनाचे जनक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आता त्यांनी थेट भाजपचं नाव घेता 113 उमेदवारांना पाडण्याचा इशारा दिला आहे. यामुळे महायूतीच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले कि मराठा समाजाची मुले अडचणीत आहेत. आरक्षण नसल्यामुळे आणि शेती मालाला भाव नसल्यामुळे आमचेच लोक अडचणीत आहे. त्यासाठी हा संघर्ष करायचा आहे. आपला आरक्षणात जीव आहे आणि आरक्षणापासून भूमिका बदलत नाही. मराठा समाज शंभर टक्के आरक्षण देऊन मोकळा करायचा आहे. निवडणुकीत मोठा होण्यासाठी रडारड करणारे खूप आहेत, त्यांनी ही रडारड समाजाच्या आरक्षणासाठी करावी, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

ऐनवेळी मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असा निर्णय जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. परंतु, पाडापाडी होणार हे आवर्जून स्पष्ट केले. यानंतर आता मनोज जरांगे यांनी 113 जणांना पाडणार असल्याचा थेट आकडाच सांगितला आहे. ते म्हणाले कि मराठा समाज निवडणुकीमध्ये सक्रीय आहे. त्यांना काय करायचे ते बरोबर कळते. ते वाट बघत असले तरी वेळेवर बरोबर काम करणार आहे. आम्ही सावधच आहोत आणि आमचे आंदोलन सुरू करणार आहोत, असही ते म्हणाले.

आमच्यासाठी आरक्षण महत्त्वाचे आहेत आणि सहा कोटी मराठ्यांना खेटणे सोपे नाही, उमेदवार पाडण्याच्या यादीत 113 जण आहेत. ज्यांनी मराठा समाजास त्रास दिला, ज्यांनी मराठा समाजाच्या मुलांकडे पहिले नाही, त्यांना मराठे पाडू शकतात. आपण भाजपचे नाव घेतले नाही. आपण फक्त 113 पडणार आहे, असे म्हणालो आहे. मी समाजाला सरळ सांगितले आहे, कोणालाही पाडा आणि कोणालाही निवडून आणा.

 लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मराठा समाजाला सन्मान होता. आता विधानसभेला मराठा समाजाला सन्मान असणार आहे. परंतु माझे मत समाजावर लादू शकत नाही. त्यांना अडचणी येतील, असे मला वागायचे नाही. कोणाला पाडा कोणाला निवडून आणा, ते बरोबर त्यांच्या हिशोबाने चालतील, असे जरांगे म्हणाले.

समाजाला संकटात आणण्यासारखे आहे. उद्या सत्ता कोणाची येऊ द्या, दोन हात करायची ताकद मराठा समाजामध्ये आहे. आम्ही आरक्षणासाठी लढणार आहोत. आम्हाला राजकारणाचा नाद नाही. मी स्पष्ट सांगितले आहे. कोणालाही पाडा, कोणालाही निवडून आणा, मराठा समाजाला एकदा आरक्षण द्यायचे आहे, असे मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले.
 लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालल्याचे अनेक ठिकाणी दिसले. आता विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टर कुठे चालणार, किती प्रभाव असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र जरांगे पाटलांच्या या इशाराने महायूतीच्या उमेदवारांची नक्कीच धाकधूक वाढली आहे.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools