छत्रपती संभाजीनगर - दि.२२(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०२४ करीता शनिवार दि.२३ रोजी मतमोजणी होणार आहे.
विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी केंद्राचे ठिकाण याप्रमाणे-
१०४- सिल्लोड- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर जळगाव हायवे, सिल्लोड ता. सिल्लोड. जि. छत्रपती संभाजीनगर.
१०५- कन्नड- इनडोअर हॉल, शिवाजी महाविद्यालय, कन्नड, ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर.
१०६-फुलंब्री- गरवारे हायटेक फिल्म्स लि. चिकलठाणा एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर.
१०७-औरंगाबाद (मध्य)- शासकीय तंत्रनिकेतन , रेल्वेस्टेशन रोड, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर.
१०८-औरंगाबाद(पश्चिम)- शासकीय अभियांत्रिकी विद्यालय, रेल्वेस्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर.
१०९-औरंगाबाद(पूर्व)-सेंट फ्रान्सीस डी सेल्स हायस्कूल, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर.
११०- पैठण- प्रशासकीय इमारत, संतपीठ, जायकवाडी धरणाजवळ, पैठण, ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर.
१११-गंगापूर- इनडोअर स्टेडियम हॉल, श्री मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर.
११२-वैजापूर- टेनिस कोर्ट हॉल, विनायक पाटील महाविद्यालय, येवला रोड, वैजापूर ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर.
मतमोजणी शांततेत व्हावी यासाठी मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. त्याअन्वये मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्राधिकृत व्यक्तिंव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तिस प्रवेश करण्यास, मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हे आदेश मतमोजणी अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी यांना लागू राहणार नाहीत,असे स्पष्ट करण्यात आले आहे. संपूर्ण परिसरात मोबाईल, टॅब, संगणक व तत्सम संदेशाची देवाणघेवाण करणाऱ्या विद्युत उपकरणे बाळगण्यास व हाताळण्यास मनाई, अनधिकृत व्यक्तिच्या प्रवेशास मनाई करण्यात आली असून या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तिविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ प्रमाणे कारवाई करण्यात येईल,असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
0 Comments