वडीगोद्री/दै.मू.वृत्तसेवा
ज्याला निवडून आणायचे त्याला आणा, ज्याला पाडायचे त्याला पाडा, मतदान हा तुमचा अधिकार आहे, असे स्पष्ट करीत ज्यांनी आरक्षणाला त्रास दिला त्याला सोडू नका, त्यांचा उभा कार्यक्रम करा, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केले. मतदानाबाबत संभ्रम नको, समाजाने बरोबर कार्यक्रम लावला आहे, असे ते म्हणाले. अंतरवाली सराटी येथे रविवारी सकाळी माध्यमांशी जरांगे बोलत होते.
यापूर्वीही आपण सांगितले आहे. लोकांमध्ये संभ्रम असण्याची गरज नाही. जे स्वार्थासाठी दुसऱ्याच्या नरड्याचा घोट घ्यायला निघाले, ते संभ्रम असण्याबाबतची चर्चा करत आहेत. समाजाने बरोबर कार्यक्रम लावला आहे. मग संभ्रम असण्याची गरज नाही. स्पष्ट सांगण्याची गरज नाही, संभ्रम ठेवण्याची गरज नाही, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. असे ते म्हणाले. मराठा समाजाच्या मागण्यांशी सहमत असणाऱ्या उमेदवारांचा व्हिडिओ घ्या, पुरावा म्हणून कामास येईल. वाटल्यास लिहूनही घ्या, त्यानंतर समाजाने कुणाच्या पाठीशी उभे राहायचे हे ठरवावे.
मनोज जरांगे पाटील दहा दिवसांत 17 जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. येत्या दहा दिवसात मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र पुन्हा एकदा पिंजून काढणार आहेत. या दौऱ्यामध्ये गावागावांमध्ये बैठका घेतील, चर्चा करतील. या दौऱ्यात केवळ आरक्षणाच्या आंदोलनाची तयारी करणार आहे, असं मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. मात्र गावागावातला जिल्हा जिल्ह्यातला त्यांच्या भेटी कुणाला महागात पाडणार याची चर्चा सुरू झाली.
तू मराठ्यांची राख केली. आमच्या डोळ्यासमोर दुसर्यांना आरक्षण दिलं, आम्हाला दिलं नाही. तू गोरगरिबांच्या नरड्याचा घोट घेतला, अशी टीका जरांगे पाटलांनी फडणवीस यांच्यावर केली. 40-50 वर्षात झालं नाही तेवढं नुकसान 5 वर्षात केलं. आंदोलन आमचं सुरू आहे, आरक्षण दुसऱ्याला देतो. याला दुसऱ्याची आई कळत नाही, असा राज्यकर्ता असतो का? थू याच्या सत्तेवर, असा हल्लाबोल जरागेंनी फडणवीस यांच्यावर केला.
मराठा समाजाने एक काम करायचं आहे, तुम्ही उमेदवाराचा आपल्या मागण्याशी सहमत असल्याचा पुरावा म्हणून व्हिडीओ घ्या, तो पुरावा आपल्याला कामाला येईल. गावकऱ्यांनी उमेदवाराकडून लिहून घ्या किंवा व्हिडीओ घ्या. समाजाने कुणाच्या पाठीशी उभे राहायचं हे त्यांनी ठरवावे. काही जण मला बॉण्ड देतात. पण आमचेच काही लोक हा चांगला नाही, तो चांगला नाही असं सांगतात.
मराठ्यांनी मतदान वाया घालू नये, याला आणा त्याला आणा असं मी सांगणार नाही. तुम्हाला कोण पाहिजे, तुमच्या आरक्षणासाठी कोण धावून येतोय हे ठरवा, राज्यात आपण कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. आपण सगळे आपल्या पुढच्या आंदोलनाची तयारी करू, कुणीही सत्तेत आलं तरी मला आंदोलन करायचं आहे. मला पूर्ण वेळ मराठा आरक्षणाच्या आंदोलनात घालवायचा आहे. आमचा जीव आंदोलनात आरक्षणात गुंतलेला आहे. कुणाच्याही सभेला प्रचाराला जाऊ नका.
ज्यांनी आरक्षणाला त्रास दिला त्याला सोडू नका, यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका. ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांना सुट्टी नाही, विरोध करणारे कोण, हे समाजाला सांगण्याची गरज नाही, मराठा तेवढा हुशार आहे. मी निवडणुकीत समाजापासून अलिप्त झालेलो नाही, लढा सुरू ठेवणं माझी जबाबदारी आहे, असही जरांगे पाटील म्हणाले.
0 Comments