नंदुरबार - राज्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असलेल्या आपल्या देशात सातपुड्याच्या डोंगर- रांगात अजूनही पायाभूत सुविधांची किती भीषण परिस्थिती आहेत, याचा धक्कादायक वास्तव समोर आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात रस्ताच्या अभावी आरोग्याच्या समस्यांना नेहमीच तोंड द्यावे लागत असते. मात्र, जिल्ह्यातील रस्त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे. प्रशासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून बाईक अॅम्बुलन्सची सुविधा उपलब्ध केली. मात्र, ती देखील उपयोगी पडत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान पाच महिन्यांच्या गरोदर महिलेस रस्त्याअभावी बांबूची झोळी करून नेताना या महिलेचा रस्त्यातच गर्भपात झाल्याची धक्कादायक घटना नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात घडली.
पिंपळखुटा ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या वेहगीच्या बारीपाडामधील गर्भवती महिलेस या पाड्यावर रस्ताच नसल्याने बांबूची झोळी करून साडेआठ किलोमीटरवरील मुख्य रस्त्यावर आणले गेले. मात्र, या भागात रुग्णवाहिकाही उपलब्ध नसल्याने या महिलेस खासगी वाहनातून पिंपळखुटाच्या रुग्णालयात नेण्यात येत होते. यादरम्यान रस्त्यातील पाणथळ जागेत हे वाहन फसले. हे फसलेले वाहन बाहेर काढण्यास बराच वेळ गेल्याने या महिलेचा गर्भपात झाला. त्यानंतर तिला पिंपळखुटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या पाड्याला ग्रामपंचायत मातीचा रस्ता करून देते. मात्र, पावसाळ्यात हा रस्ता वाहून जात असल्याने पावसाळा आणि हिवाळ्यात रस्त्याअभावी जीवघेणा प्रवास स्थानिकांना करावा लागत आहे.
नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असून सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने आजही जिल्ह्यातील अनेक गाव- पाड्यांपर्यंत पोहचण्यासाठी रस्ता नाही. यात वाहन जाणे तर दूरच. दरम्यान रस्ता नसल्याने पायपीट करतच रुग्णालयात पोहचावे लागते. तर गरोदर महिलांना तर अगदी बांबूची झोळी करून न्यावे लागते. अशाच घटनेत येथील महिलेचा गर्भपात झाल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आता तरी या भागात चांगले रस्ते व्हावेत, अशी अपेक्षाही स्थानिकांनी व्यक्त केली.
विधानसभेत कोट्यावधीच्या विकासाच्या गोष्टी सत्ताधारी आणि विरोधकांकडून केल्या जात आहे. मात्र आज रस्ता नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वेहगीच्या बारीपाडा मधल्या एका गर्भवती महिलेचा रस्त्यात गर्भापत झाला. रस्ता नसल्याने या महिलेला साडेआठ किलोमीटर बांबुची झोळी करुन मुख्य रस्त्यावर आणले जात होते. रुग्णवाहीका नसल्याने खाजगी गाडीतून पिपंळखुटाच्या रुग्णालायत आणले जात होत.
दरम्यान रस्त्यातच गाडी पाण्यातील चिखलात फसली. त्यामुळे या सर्व परिस्थीतीत बराच वेळ गेला. परिणामी रस्त्यातच महिलेचा पाच महिन्याचा गर्भपात झाला. यानंतर तिला पिपंळखुटा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
0 Comments