खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज दिनांक १६/१२/२०२४ पर्यंत स्विकारणेस मुदतवाढ देणेबाबत.

समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे-1 दूरध्वनी 0.20-26127569

ईमेल - sakalyangovthostel@gmail.com

क्र. सकआ/शिक्षण/स्वाधार/सन २०२४-२५ अर्ज मुदत/ १६.१२.२०२४ पर्यंत/२०२४-२५/का-५३/३६ry

पुणे, दिनांक: २-८.११.२०२४.

प्रति.

१) प्रादेशिक उपआयुक्त, समाज कल्याण (सर्व)

२) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण (सर्व)

विषयः सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज दिनांक १६/१२/२०२४ पर्यंत स्विकारणेस मुदतवाढ देणेबाबत...

संदर्भ: १) आयुक्तालयाचे परिपत्रक क्र. २४९४, दिनांक ३१.०७.२०२४.

२) आयुक्तालयाचे पत्र क्र. ३२५३, दिनांक १४.१०.२०२४.

आयुक्तालयाचे संदर्भ परिपत्रकान्वये शासकीय वसतिगृह प्रवेश व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. याबाबतचे अर्ज ऑनलाईन पोर्टलव्दारे स्विकारण्यात येत आहेत.
शैक्षणिक संस्थांमध्ये काही अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रीया अद्यापही सुरू आहेत ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना चालू सन २०२४-२५ या वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज दिनांक ३०/११/२०२४ पर्यंत करण्यास मुदत देण्यात आलेली होती.

अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन पोर्टलव्दारे दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत आणि या प्रवर्गात्तील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन प्रणालीव्दारे आपोआप स्वाधार योजनेसाठी वर्ग होणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. याबाबत सर्व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी असेही कळविण्यात आलेले आहे.

विद्यार्थ्यांचे उशिरा सुरू होणारे शैक्षणिक सत्र. सद्यस्थितीत स्वाधार योजनेचा लाभ घेत असलेले विद्यार्थी तसेच नव्याने स्वाधार योजनेसाठी अर्ज करणारे विद्यार्थी यांना ऑनलाईन अर्ज करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. काही विद्यार्थी संघटना आणि क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी यांनी मुदतवाढ देण्याबाबत मागणी केली आहे. या बाबी विचारात घेता अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दिनांक १६ डिसेंबर, २०२४ पर्यंत वाढविण्यात येत आहे.


त्याचप्रमाणे सर्व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांना सूचित करण्यात येते की, त्यांनी सध्या अस्तित्वात असलेल्या किंवा सद्यस्थितीत स्वाधार योजनेचा लाग घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज या मुदतवाढीच्या कालावधीतच भरून घेण्याची कार्यवाही करावी.

28-11-24-

(ओम प्रकाश बकोरिया) आयुक्ा, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

प्रतः कार्यवाहीस्तव.

प्रकल्प अधिकारी, महाआयटी कॉर्पोरेशन लिमिटेड, एपीजे हाऊस, चर्चगेट, मुंबई १

यांना सूचीत करण्यात येते की, या पत्रान्वये स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची गुदत दिनांक १६.१२.२०२४ रोजीपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. याबाबत स्वाधार योजनेच्या पोर्टलमध्ये या मुदतीपर्यंत अर्ज स्विकारण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools