छत्रपती संभाजीनगर,दि.२२(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०२४ करीता शनिवार दि.२३ रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी केंद्रावर निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे सर्व तयारी करण्यात आली आहे.
आज दुपारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी १०७-औरंगाबाद मध्य, १०८-औरंगाबाद पश्चिम, १०९-औरंगाबाद पूर्व या विधानसभा मतदार संघांच्या मतमोजणी केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.
१०७-औरंगाबाद (मध्य) चे मतमोजणी केंद्र शासकीय तंत्रनिकेतन , रेल्वेस्टेशन रोड, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर, १०८-औरंगाबाद(पश्चिम)चे मतमोजणी केंद्र शासकीय अभियांत्रिकी विद्यालय, रेल्वेस्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर, तर १०९-औरंगाबाद(पूर्व)-सेंट फ्रान्सीस डी सेल्स हायस्कूल, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर या केंद्रांना त्यांनी भेटी दिल्या.
संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून मतमोजणी केंद्राची रचना, तेथील सुरक्षा व्यवस्था, माध्यम कक्ष, टपाली मतांच्या मोजणीची व्यवस्था, स्ट्रॉंगरुम, मतदान यंत्रांची स्ट्रॉंग रुम ते मतमोजणी कक्ष अशी केली जाणारी वाहतुक अशा विविध बाबींची पाहणी केली.
त्याचप्रमाणे मतमोजणी केंद्राकडे येणारे व तेथून बाहेर जाणारे मार्ग, त्यावरील सुरक्षा व्यवस्था इ. बाबींची पाहणी केली.
0 Comments