भारतीय दलित पँथर चा कोणाला ही पाठींबा नाही
सर्वच राजकीय पक्षांना दलितांची मते हवी आहेत परंतू त्यांच्या प्रश्नावर बोलायला कोणीही तयार नाही. मते आमची आणि सत्ता तुमची हे चालणार नाही त्यामुळेच भारतीय दलित पँथर ने कोणालाही पाठींबा दिलेला नाही .
संविधान विरोधी , आरक्षण विरोधी, दलित विरोधी उमेदवाराला पाडा
संविधान जाळणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या; संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या , आरक्षण संपविण्यासाठी क्रिमीलीयरचा आणि उपवर्गीकरणचा घाट घालणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला पाडा . विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करणाऱ्या, समाजकल्याणचा निधी इतरत्र वळवणाऱ्या , पदोन्नतीतील आरक्षण संपविणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला पाडा.
आमचं आरक्षण संपविल्या जात आहे त्यामुळे आरक्षण टिकविण्याचा आमचा लढा आहे.
- प्रविण पाटील (अमरावती जिल्हा प्रमुख)
भारतीय दलित पँथर
0 Comments