भोकरदन - परभणी घटणेचा निषेधार्थ भोकरदन भिम आर्मीच्या वतीने निषेध व्यक्त करून तालुका अध्यक्ष अनिल पगारे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 17 डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्या चे निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, पोलिसांच्या कॉम्बिन ऑपरेशन ची आणि सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून कलम 176 (1A) सीआरपीसी अन्वये या प्रकरणाची चौकशी करावी,न्यायालयीन चौकशी ही सेवानिवृत न्यायाधिशाकडून न करता सिटींग न्यायाधिशामार्फत करावी, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड सह इतर पोलीस अधिका-यांवर कलम ३२ अन्वये, अॅट्रॉसिटी कायद्यान्वये कलम 3(1) आणि 3(2) प्रमाणे गुन्हे दाखल करावेत, सोबतच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशन मधील तातडीने सीसीटीव्ही जप्त करून ते सीसीटिव्ही तपासावे, सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारने तातडीने कोटि रुपयाची आर्थिक मदत जाहीर करावी व तत्काळ देण्यात यावी सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तिस तातडीने शासकीय नोकरी देवून त्यांचे पुर्नवसन करावे आशा विविध मागण्या चे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.
यावेळी भीम आर्मी भोकरदन तालुका प्रमुख अनिलभाऊ पगारे, शहर अध्यक्ष पंडित बिरसोने, शहर उपाध्यक्ष साबेर शेख, तालुका संघटक शब्बीर मंन्सुरी, आम आदमी पार्टी चे शहर अध्यक्ष महेजाद ख़ान, शहर उपाध्यक्ष फारुक भाई
जमिल कादरी साहब, शेख मुदस्सिर लिलाबाई टेकाळे
बाबर शहा, योगेश आरके, सुखदेव साळवे आदी कार्यकर्ता पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
0 Comments