जालना प्रतिनिधी (साबीर शेख) : जिल्ह्यातील जाफ्राबादहून चिखलीकडे जाणारी एसटी बस कोळेगाव फाट्याजवळ भीषण अपघातग्रस्त झाली. कोळेगाव घाटरस्ता चढत असताना बस सुमारे २० फूट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातात १५ ते १६ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.
जखमींना तातडीने चिखली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमागील प्राथमिक कारण बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याचे समोर आले आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. पोलीस प्रशासनानेही त्वरित मदतकार्य सुरू केले असून, या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
0 Comments