भारतीय दलित पँथरने केले मनुस्मृतीचे दहन.
अमरावती :- भारतीय दलित पँथरच्या वतीने २५ डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती येथे मनुस्मृती या विषमता व जातीयवादी विषारी ग्रंथाचे दहन करून मनुस्मृती दहन दिवस साजरा करण्यात आला. २५ डिसेंबर १९२७ रोजी याच दिवशी प. पूज्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या जागतिक विद्वानाने महाडच्या चवदार तळ्याच्या सत्त्याग्रहाप्रसंगी सहस्त्रबुध्दे या ब्राम्हणाच्या हातून मनुस्मृतीचे दहन केले होते.
ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने पुस्तके (ग्रंथ) ठेवण्यासाठी भव्य असी इमारत बांधली . राजगृहा मध्ये भव्य असे ज्यांचे ग्रंथालय आहे. ज्यामध्ये पस्तीस हजार ग्रंथ साठा सग्रहीत केला. असे पुस्तकावर जिवापार प्रेम करणाऱ्या प्रज्ञावंताने मनुस्मृती नावाचा हिंदुत्ववादी ब्राम्हणी ग्रंथ जाळून होळी करावी ? म्हणजेच हा ग्रंथ किती जहरीला असावा ? हे लक्ष्यात येते.
मनुस्मृती म्हणजे भारतीय लोकांचे सर्व मूलभूत अधिकार नाकारणारे ब्राम्हणी प्रवृत्तीने तयार केलेले भारताचे ते संविधान होते. या संविधानाच्या भरवश्यावर या देशात चातुर्वर्ण्य व्यवस्था राबऊन मूठभर ब्राम्हणांनी भारतातील सर्व लोकांना जाती पोटजातीत विभागून हजारो वर्षापासून गुलामीत ठेवले होते. मनुस्मृतीने सर्वाधिक सर्वच जातीच्या महिलांवर प्रचंड अत्त्याचार केला.
इथल्या ब्राम्हण सोडून सर्व बहुजन समाजाचे सर्व मूलभूत अधिकार मनुस्मृती द्वारे नाकारण्यात आले होते. इथल्या लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता , धन संग्रहित करण्याचा अधिकार नव्हता,चागले अन्नखण्याचा. चांगल्या घरात राहण्याचा , जुलूमावर दाद मागण्याचा कोणत्याच प्रकारचा सामाजिक , राजकीय , धार्मिक , आर्थिक , न्यायिक अधिकार नव्हते , जतिजाती मध्ये उच्च निच्चता व अस्पृश्यता निर्माण करून मनुस्मृतीच्या द्वारे भारतीय समाजावर हजारो वर्षापासून अन्याय करून मूठभर लोकांनी देशाला गुलामीत ठेऊन सत्ता उपभोगली आहे
म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने विषमतावादी मनुस्मृतीचे दहन करून भारतीयांना हजारो वर्षापासून च्या गुलामीतून मुक्त केले आणि समता , स्वातंत्र्य , बंधुता , न्याय आणि लोकशाही चे खरे भारतीय संविधान देशाला बहाल केले. देशाला देशातील मानवाला खरे स्वातंत्र्य मिळाले.
मनुस्मृती वादी प्रवृत्ती अजूनही देशात जिवंत असून डोकं वर काढीत आहे. ते डोकं ठेचून काढण्या साठी भारतीय लोकांनी संघठीत होऊन जागृत व सावधान राहावे असे आवाहन भारतीय दलित पँथरने या प्रसंगी केले आहे.
याप्रसंगी या कार्यक्रमाला पँथर प्रविण पाटील जिल्हा अध्यक्ष अमरावती, जेष्ठ पँथर नेते गौतम कांबळे मुंबई, गंभीर साहेब अमरावती, वसंत शेंडे अमरावती, मनोज धुळेकर, राजु भाउ शेंडे, शिवदास गायकवाड,रवि शेंडे, केशव गायकवाड,धर्मा भाउ बागडे, प्रकाश डोंगरे, अरुण वासनिक, सचिन मेश्राम, नागेश पाटील,अंकित मेश्राम, नागेश मेटांगे, हे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments