मृद व जलसंधारण जालण्याचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुंदर वाघमारे यांनी संपादकाला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत आरोपी अभियंता सुंदर वाघमारेवर गुन्हा दाखल, निलंबित करणे बाबत
उन्नती पत्राचे संपादक बाजीराव सोनवणे यांना अश्वनील व आवर्च भाषेत शिवीगाळ करुन मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून 20 डिसेंबर 2024 रोजी वेदांतनगर पोलीस ठाणे छत्रपती संभाजीनगर येथे मर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. अभियंता हे भोकरदन येथे १द व जलसंधारण उपअभियंता म्हणून कार्यरत आहेत. तसेच जालना येथील प्रभारी कार्यकारी अभियंतापदी पदभार दिलेला आहे. सिनबा, कोपब, गावतलाव, पाझर तलाव आदि देखभाल दुरुस्तीच्या कामात अनियमितता केलेली आहे. सदर अभियंता सुंदर वाघमारे हे 1990 साली उपविभाग जालना येथे शाखा अभियंता म्हणून नौकरी लागले होते. भोकरदन उपविभागातून अभिलेख गायब आहे. छत्रपती संभाजीनगर मंडळ स्तरावरुन पत्रव्यवहार झालेला आहे. तरी संबंधित अभियंता सुंदर वाघमारे यांनी कोनतेही उत्तर दिलेले नाही. किंवा कोनतेही अभिलेखे दिलेले नाही.
ह्या सर्व बाबींची दक्षता घेऊन प्रभारी पदावरुन कार्यमुक्त करावे आणि त्याठिकाणी लायक अभियंताची नियुक्ती करावी. सुंदर वाघमारे यांनी अनेक बोगस कामे करत मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमा केली आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी पडून आहे शिवाय उपोषण देखील होत असतात मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. पैशाची इतकी मस्ती वाढली की, भ्रष्टाचाराची बातमी छापली म्हणून संपादकाला अश्लील व आवार्च भाषेत शिवीगाळ करीत मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
यासंदर्भात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करून संबंधित गुन्हा दाखल असलेल्या अभियंताला अटक करुन कोर्टात हजर करण्यात यावे यासाठी पत्रव्यवहार केला आहे. शिवाय मृद व जलसंधारण मंत्री मा. श्री संजय राठोड यांना देखील कारवाई करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. आपणास विनंती करण्यात येते की, आपल्या राज्यात पत्रकारांवर हल्ले होऊ नये म्हणून कारवाई होणे आवश्यक आहे. शिवाय इतरांना त्याचा धडा मिळणार आहे. त्यामुळे निलंबित करण्यात यावे हि विनंती.
0 Comments