मा मुख्यमंत्री देवेन्द्र फडनविस
मा जिल्हाधिकारी, कार्यालय परभणी
मा जिल्हा अधिकारी कार्यालय जालना
मा उप विभागीय अधिकारी भोकरदन मार्फत.
परभणी प्रकरणी खालील प्रमुख मागण्या…
१) पोलिसांच्या कोबिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी.
2) कलम 176 (1A) सीआरपीसी अन्वये या प्रकरणाची चौकशी करावी.
3) न्यायालयीन चौकशी ही सेवानिवृत्त न्यायाधिशाकडून न करता सिटींग न्यायाधिशामार्फत करावी.
4) पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड सह इतर पोलीस अधिका-यांवर कलम ३२ अन्वये, अॅट्रॉसिटी कायद्यान्वये कलम 3(1) आणि 3(2) प्रमाणे गुन्हे दाखल करावेत. सोबतच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
५) परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशन मधील तातडीने सीसीटीव्ही जप्त करून ते सीसीटिव्ही तपासावे.
६) सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारने तातडीने 50 लाखाची आर्थिक मदत जाहीर करावी.
७) सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तिस तातडीने शासकीय नोकरी देवून त्यांचे पुर्नवसन करावे.
८) वच्छलाबाई मानवते या महिलेला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तातडीने 354, 307 अंतर्गत गुन्हे दाखल करुन त्यांना निलंबीत करावे.
९) वच्छलाबाई मानवते यांना सरकारने १० लाख रुपयाची आर्थिक मदत करून त्यांचे पुर्नवसन करावे.
१०) न्यायालयीन कोठडीत असलेल्या आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्वाचे पुन्हा एकदा न्यायाधिश यांच्या उपस्थितीत मेडीकल करावे.
११) पोलिसांनी केलेल्या कोबींग कारवाईत बौध्द वस्तीतील लोकांच्या झालेल्या घरांची नुकसान भरपाई द्यावी. जिल्हा प्रशासनाने त्या सर्व घरांचे तातडीने पंचनामे करून घ्यावे.
१२) पोलिसांच्या कोबिंग कारवाईत निर्दोष जखमी झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी.
१३) संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.
१४) १० डिसेंबर २०२४ रोजी पार पडलेला सकल हिंदू समाज मोर्चातील संयोजक यांची चौकशी करावी. यासोबत त्या मोर्चातील सर्वांची भाषणे तपासून त्यांच्यावर कारवाई करावी.
0 Comments