खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

आंबेडकरवादी संघर्ष समिती समाजाच्या मागण्यासाठी काढणार मशाल मोर्चा - श्रावण दादा गायकवाड

छत्रपती संभाजीनगर ( प्रतिनिधी) दिनांक २ डिसेंबर २०२४ रोजी आंबेडकरवादी संघर्ष समितीची महत्वापुर्ण बैठक जेष्ठ मार्गदर्शक रामराव दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालीं.यावेळी समितिचे अध्यक्ष श्रावणदादा गायकवाड हे प्रमुख मार्गदर्शन करताना म्हणाले की, आंबेडकरी समाजाच्या जिव्हाळ्याच्या मुलभूत मागण्यासाठी समितीच्या वतीने मागिल तिन वर्षांपासून एल्गार मार्च, क्रांती मार्च, शांती मार्च, ढोल बजाओ, घंटानाद,जबाब दो,धरणे, निदर्शने,यासारखे अनेक आंदोलने करुनही शासन प्रशासन केवळ जातियद्धेशातून आंबेडकरी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे, तसेच बैठकीत याबाबत जिल्हा प्रशासनास जाब विचारण्यासाठी समितीच्या वतीने भव्य मशाल मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी भाई एस एस जमधडे, किशोर गडकर, बाळु भाऊ वाघमारे, प्रा.दिपक खिल्लारे,गोतम गणराज, राहुल वडमारे, विनोद कासारे, अरुण खरात, मच्छिंद्र दादा नरवडे, प्रा.अनिल गवळे विजय मोरे, बाळु मगरे, कचरु गवळी  यांनीही मौलिक सूचना करून आपले मत मांडले.

बैठकीस जि.एस.दोडवे, अर्जुन दाभाडे, मिलिंद दाभाडे, अशोक सोनवणे, मनोज्ञ नरवडे, राजु म्हस्के, कांतिलाल सोनवणे, राजु मगरे, अनिल खरात, भास्कर मुगदल,सि.डी. खिल्लारे, रोहित भालेराव, राहुल जाधव, राजु गाडेकर, अंकुश शिंदे,सुरज मगरे, विशाल मोरे,अकाश गंगावणे, रवि बोर्डे,हिम्मत डोंगरे, विनोद जाधव, आनंद भांडे, दत्ता चौधरी, सचिन चौथमल, संतोष निकम, सतिश ससाणे,राजु काळे, राजु पहुरकर, सुमित जाधव, संतोष बनकर, भिमराव ढेपे, बाबासाहेब भिवसने, संजय छडिदार,अक्षरा मगरे आदिंसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचलन सोमनाथ वाघमारे यांनी केले.

न्यूज 24 खबर - संपादक किरण आरके 9762049003

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools