छत्रपती संभाजी नगर, अहिल्यानगर, नाशिक, बीड, परभणी, हिंगोली, जालना, बुलढाणा, धुळे, जळगाव, पुणे अशा विविध जिल्ह्यातून शंभरपेक्षा जास्त फुलेप्रेमी कवींनी उपस्थित राहून देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा या विषयावर दर्जेदार अर्थपूर्ण समाजजागृती व प्रबोधन करणाऱ्या कविता सादर करून रसिकांची मने जिंकली.
बाल कलाकार ओवी काळे हिने ' होय मी सावित्री जोतिराव फुले बोलतेय " हे एकपात्री सादर करून समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.या अभियानांतर्गतच संविधानजागर अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या फुलेप्रेमींना संविधान दूत बॅच देऊन सन्मानित करण्यात आले.
क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाच्या दैदिप्यमान इतिहासाला उजाळा मिळावा तसेच फुले दांपत्याने सुरु केलेल्या देशातील मुलींच्या पहिल्या शाळेचा इतिहास जतन व्हावा, जनमाणसात, पुढील पिढ्या पर्यंत पोहोचावा यासाठी या काव्यजागर अभियानांतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जिल्ह्यास्तरीय भिडे वाडा कविसंमेलन करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे या अभियानाचे जनक आयोजक फुलेप्रेमी संविधान दूत भिडेवाडा कार विजय वडवेराव यांनी सांगितले.
या कविसंमेलनाचे वेगळेपण म्हणजे सभागृहात उपस्थित असणारे शेकडो फुलेप्रेमी कविसंमेलनाचे अध्यक्ष होते.
सर्वांसाठी चहा, नाष्टा, उत्कृष्ट जेवण या सुविधा मोफत पुरवण्यात आल्या. कवितेच्या सादरीकरणानंतर सर्व फुलेप्रेमी कवींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजीनगर येथील
फुलेप्रेमी संविधान दूत सागल गायकवाड व
त्यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स चे सहकारी विद्यार्थी मित्रांनी मोलाचे सहकार्य केले.
0 Comments