भर पावसात सुध्दा आंदोलन कर्त्यांनी जेवणाच्या चुली पेटवत स्वयपाक केला.
गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासींचे प्रलंबित वन दाव्यासाठी भारताचा माक्सवादी- लेनिनवादी लाल बावटा पक्षाने बोईसर फारेष्ट कार्यालयावर 25 जुन पासुन बेमुदत बिर्हाड आंदोलनाला सुरुवात केली होती.
बोईसर एस टी डेपोतुन साकाळी दोन दोनच्या रांगेत शिस्त बंध्दीने रॅली काढत मोर्चाला सुरूवात झाली.
ह्या वेळी आंदोलनात सहभागी झालेले आदिवासी महीला पुरुष डोक्यावर लाकडांचे भारे, टोप, कांदा बटाटा, तांदूळ, स्वयपाकाचे सर्व सामन घेऊन हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. वनविभाग कार्यालयावर मोर्चा धडकताच पोलीस व वनविभाग अधिकार्यांची तांरबळ उडाळी होती.
मोर्चाचे रुप आक्रमक होते मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
राज्य सचिव काॅ. आदेश बनसोडे जिल्हा सह सचिव काॅ शेरू वाघ शहापूर तालुका सचिव काॅ भगवाण म्हणणे डहाणू तालुका कमिटी सदस्य काॅ वामन किंडरा, काॅ किरण डुबळा ह्यांचे जोरदार भाषणे झाली. भाषणातून वन विभागाला चांगलेच धारेवर धरले. काॅ सिता जाधव लोकशाही महिला संघटना जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष काॅ भारती गुजर काॅ अरुणा मुकणे ह्यांनी परीस्थितीवर आधारित आंदोलनाची गाणी गात आंदोलनाची शोभा वाढवली. तसत शिष्य मंडळ व प्रशासनासोबत चर्चा चालू होती. दोन दिवसात तुमचे दावे निकाली काढु असे आश्वासन देण्यास प्रशासण तयार होते. परंतु आश्वासन नको अमलबजावणी हवी. अशी भुमिका लाल बावटा पक्षाने स्पष्ट मांडळ्याने प्रशासण कामाला लागले.
डहाणू पंचायत समिती विस्तार अधिकारी पंढरीनाथ पाटील. ग्रामसेवक,सरपंच, वन हक्क समिती, ह्यांना महा घेराव घालण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांनी जेवणाच्या चुली पेटवल्या तेव्हा प्रशासण कामाला लागले. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पेटत्या चुलीवर छत्री धरून जेवण करण्यात आले. प्रचंड पाउस वारा असुन सुद्धा आंदोलन कर्त्यांचा निर्धार ठाम असल्याने प्रशासणाला झुकावे लागले.
सर्व प्रलंबित वन दाव्यांची पुर्तता करुन मध्यरात्री प्रांत कार्यालयात दाखल करण्यात आल्याने रात्री उशिरा हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय कमिटीने घेतला. पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना प्रचंड सहकार्य केल्यामुळे बोईसर पोलीस निरीक्षक पवार ह्यांचे आभार दाभोण गाव कमिटी सचिव काॅ रामजी बरड ह्यांनी मानले.
प्रतिनिधी ~ सनिल माहिमकर
0 Comments