अमरावती:- दि 13/07/2025 ला भारतीय दलित पँथर सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना वृत्तपत्रातून माहिती मिळाली की वाशिम जिल्ह्यातील मंगरुळ पीर तालुक्यातील अंबापुर गावात एका अल्पवयीन मुलीने १२जुलैला आत्महत्या केली व मंगरूळ पिर पोलिस स्टेशनला १३ जुलै ला गुन्हा दाखल करण्यात आले.
हि बातमी वाचुन भारतीय दलित पँथर सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दि.१५ जुलै ला घटना स्थळी अंबापुर या गावात जाऊन मृत मुलिच्या परिसरातील सर्व जामनेकर कुटुंबाशी सांत्वन भेट देऊन चेर्चा केली. तिथे मृत मुलिचे वडील, आई, व लहान भाऊ होता. मृत मुलिच्या लहान भावाने सांगितले की माझ्या बहिणीला गेल्या बरेच दिवसा पासून हे लोक त्रास देत होते.
आतीश चवरे, अमोल टोने,व आणखी एक व्यक्ती होता. या वेळेस गावातील सर्व महिला पुरुष तरूण उपस्थित होते.
त्यांच्या सोबत चर्चा करून करत आसतांनी असे लक्षात आले की मृत मुलिचा परिवार हा अजून ही आरोपींच्या दहशदीत, आहे.
नंतर भारतीय दलित पँथर सामाजिक संघटने चे सर्व कार्यकर्ते मंगरूळ पिर च्या पोलिस स्टेशनला भेट देऊन पिडीत अन्याय ग्रस्त परिवाराला पोलिस प्रोटेक्शन द्यावे व ज्या प्रकारे दोन आरोपी लगेच अटक केले तसेच बाकी चे आरोपी लवकरात लवकर पकडा असे निवेदन दिले व ठनकाउन सांगितले या पिडीत परीवाराच्या पाठिसी आता महाराष्ट्रातील सर्व पँथर कार्यकर्त्ये आहेत आपन सखोल सहानीशा करून सर्व गुन्हेगाऱ्यांना ॲट्रॉसिटी ॲक्ट व अन्य कलमा लावून कठोरात कठोर शिक्षा द्यावी या मागणीचे निवेदन दिले .
यावेळेस भारतीय दलित पॅंथर चे अशोक कांबळे, अमरावती जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील, मनोज धुळेकर, अजय रामटेके, आदित्य रंगारी, प्रशांत रामटेके, शिवदास गायकवाड, न्यूज रिपोर्टर पद्मा मोहोळ मॅडम सर्व पॅंथर कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments