मुंबई / दिनांक 30 ऑगस्ट रोजी भारतीय दलित पँथर सामाजिक संघटनेची अत्यंत महत्त्वाची बैठक अल्का हॉटेल ठाणे स्टेशन मुंबई येथे भा.द.पँथर चे महाराष्ट्र संघटक अशोकभाऊ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या बैठकीला ठाणे जिल्हा मुंबई, पालघर, वसई विहार, कल्याण, पाटलिवाळा, तुर्वे,वाशी या सर्व भागातिल महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.
17 वर्ष नामांतरा साठी केलेल्या संघर्षाची जाणीव ठेवून आम्ही पण या भारतीय दलित पॅंथर सामाजिक संघटनेत सहभागी होऊन एकजुटीने समाज हितासाठी समाजाच्या संरक्षणासाठी संविधानाच्या संरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता आम्ही एक निष्ठेने लढू ही जिद्द मनाशी ठेवून सर्व महिलांनी भारतीय दलित पॅंथर मध्ये सहभागी होण्यासाठी आश्वासन दिले.
महाराष्ट्र संघटक अशोकभाऊ कांबळे यांनी लवकरच पदग्रहण सोहळा ठरवण्यात येईल असे आश्वासन दिले.
0 Comments