खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

पिडीत मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी न्यायालयात; पुढील सुनावणी 15 सप्टेंबर रोजी!

पुणे : 1 आणि 2 ऑगस्ट 2025 रोजी तीन मागासवर्गीय पिडीत मुलींची तक्रार कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये नोंदवून घेतली गेली नाही. यामुळे 3 ऑगस्ट रोजी संबंधित मुली व त्यांच्या कुटुंबीयांसह कार्यकर्ते पुणे पोलिस आयुक्तालयात दिवस-रात्र ठाण मांडून न्यायाची मागणी करत होते. मात्र, पोलिस प्रशासनाकडून कोणतेही सकारात्मक उत्तर मिळाले नाही.

या अन्यायाविरोधात पोलिसांवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि गुन्हे दाखल व्हावेत या मागणीसाठी 28 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन रीट दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणाची पहिली सुनावणी 3 सप्टेंबर 2025 रोजी शिवाजीनगर न्यायालय, पुणे येथे पार पडली. न्यायालयाने या प्रकरणी पुढील सुनावणी 15 सप्टेंबर रोजी ठेवली आहे. 

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, ॲड. रेखा चौरे, ॲड. किरण कदम, महिला आघाडी शहर अध्यक्षा अनिता चव्हाण, युवा आघाडी शहर अध्यक्ष सागर आल्हाट, यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे की, या प्रकरणी पोलिसांचा अन्याय कधीही सहन केले जाणार नाही. न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील.

सौजन्य: प्रबुद्ध भारत 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools