खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

परभणी जिल्ह्यातील सर्व कार्यकारिण्या बरखास्त

वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्ह्यातील जिल्हा, तालुका व शहर कार्यकारिणीचा दिनांक 05/09/2025 रोजी एकत्रित आढावा घेण्यात आला. त्यात परभणी जिल्ह्यातील सर्व कार्यकारिण्या बरखास्त करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले.

त्यानुसार, परभणी उत्तर जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती यांच्या अध्यक्षतेखालील परभणी उत्तर जिल्हा कार्यकारिणी व परभणी दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील मगरे यांच्या अध्यक्षतेखालील परभणी दक्षिण जिल्हा कार्यकारिणी तसेच परभणी उत्तर व दक्षिण जिल्ह्यातील सर्व तालुका व शहर कार्यकारिण्या बरखास्त करण्यात येत आहेत.
लवकरच परभणी जिल्हा, तालुका व शहराच्या नवीन कार्यकारिण्या पुनर्गठन करण्याकरिता मुलाखतीचे स्थळ व तारीख घोषित करण्यात येईल. त्यात सर्व आजी-माजी पदाधिकारी, जुने-नवीन कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

VBAforIndia

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools