जामखेडसह राज्यभर ओला दुष्काळ जाहीर करावा, यासाठी ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रभारी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांना निवेदन देण्यात आले.
🔷औरंगाबाद :
मुलींच्या शैक्षणिक शुल्क माफी असूनही काही महाविद्यालयांकडून अन्यायकारक शुल्क वसूल केले जात आहे. ही वसुली त्वरीत थांबवावी, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने जिल्हाध्यक्ष अक्रम खान यांच्या नेतृत्वाखाली उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. पंकजा वाघमारे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
🔷सोलापूर :
अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, यासाठी सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.
🔷औरंगाबाद :
वंचित बहुजन युवा आघाडी, औरंगाबाद मध्य शहर कार्यक्षेत्रात हर्सूल, एकतानगर आणि आंबरहिल येथे शाखांचे उद्घाटन करण्यात आले. युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड आणि मध्य शहर अध्यक्ष संदीप जाधव यांच्या हस्ते शाखांचे उद्घाटन करण्यात आले.
प्रतिनिधी : विशाल पठारे
0 Comments