नंदुरबार (दि. २२ सप्टेंबर) : नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी भागात १६ सप्टेंबर रोजी घडलेल्या भीषण खुनाच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. आदिवासी समाजातील तरुण जयेश राजु वळवी याचा स्कुटीवर आलेल्या आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून खून केला. घटनेनंतर तातडीने दवाखान्यात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला.
ही घटना केवळ वैयक्तिक वाद नसून समाजात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारीतून घडवून आणली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) मोक्का कायदा अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासादरम्यान काही पोलीस कर्मचाऱ्यांकडून निष्काळजीपणा झाल्याचे आरोप पुढे आले आहेत. त्यामुळे संबंधितांवर विभागीय चौकशी करून संविधानातील कलम ३११ नुसार सेवेतून बडतर्फीची कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
तसेच आरोपींची नार्को टेस्ट, स्वतंत्र SIT मार्फत चौकशी व या खटल्याचा न्यायालयीन पाठपुरावा करण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याची मागणी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली.
या घटनेमुळे नंदुरबार शहरात तणावाचे वातावरण असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे
समाजात पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर कारवाई होणे अत्यावश्यक असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले.असे निवेदनात म्हटले आहे
त्यावेळी संघटनेचे प्रदेश प्रवक्ता ॲड गणपत पाडवी नंदुरबार, जिल्हाध्यक्ष रवी दादा सोनवणे, उमेश असावे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष गणेश दादा, कार्याध्यक्ष संतु दादा, नंदुरबार सुरेश वळवी, नंदुरबार जिल्हा तळोदा तालुका अध्यक्ष दिनेश पाडवी, सहसचिव प्रशांत पवार, करण पाडवी, नवनाथ वसावे, लहू गायकवाड, मोहन ठाकरे, सुनील मोरे आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी: राहुल आगळे
0 Comments