मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा विजयी झेंडा फडकवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला.
युवकांशी आणि नागरिकांशी संवाद साधत, मुंबईकरांच्या समस्यांवर तोडगा काढण्याच्या उद्देशाने हा सोहळा पार पडला. वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रभाग समन्वयक मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते. हा सोहळा वंचित बहुजन युवा आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सागर गवई यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे आणि महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहनी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सौजन्य:वंचित बहुजन आघाडी मुंबई
0 Comments