मे. ढोलकिया एन्टरप्राइजेस या व्यावसायिकाविरोधात विभागातर्फे कारवाई सुरु करण्यात आली होती. कारवाई दरम्यान सदर व्यापाऱ्याने चुकीची कर वजावट व बनावट बिजके (इनव्हॉइस) जारी करून ११.८० कोटींची महसूल हानी केल्याचे निदर्शनास आले.
मा. अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी, मुंबई यांनी आरोपी इब्राइम असलम ढोलकिया यांस ८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभाग सर्व समावेशक नेटवर्क विश्लेषण संसाधनांचा वापर करुन आणि इतर विभागांशी समन्वय साधून कर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेत आहे. वित्तीय वर्ष २०२५-२६ मधील ही २९ वी अटक आहे.
0 Comments