वंचित बहुजन आघाडीचे स्वप्नील जवळगेकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाची दुरवस्था जनतेसमोर आणून दिली होती. अनेक वर्षांपासून मैदानाची दुरवस्था होत असताना महानगरपालिका प्रशासन मात्र दुर्लक्ष करत होते.
याच निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने एल विभाग सहाय्यक आयुक्तांना “पाटी–पेन्सिल” भेट देऊन अनोखा निषेध नोंदवला. यांचीदखल घेत सहाय्यक आयुक्तांनी तातडीने मैदानाच्या कामाला सुरुवात केली आहे.
आता हे मैदान सुसज्ज आणि सुरक्षित स्वरूपात तयार होणार आहे — आणि हे शक्य झाले आहे वंचित बहुजन आघाडीच्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे.
तसेच, मैदानाचे मुख्य प्रवेशद्वार “चैत्यभूमी प्रवेशद्वार कमानी” प्रमाणे उभारण्यात यावे यासाठीही एल विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला असून सहाय्यक आयुक्तांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीचा लढा आता ठामपणे सुरु आहे —
जोपर्यंत मैदानावर चैत्यभूमीप्रमाणे मुख्य प्रवेशद्वार उभा राहत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही!
📍 स्थान: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, SKP शाळे जवळ नेहरु नगर कुर्ला (पूर्व)
✊ संघर्षातून निर्माण होतो परिवर्तन!
सौजन्य: वंचित बहुजन आघाडी
0 Comments