नवी मुंबई : नोशील रबाळे नवी मुंबई येथील 16 वर्षाच्या चांभार समाजातील मुलीला शाळेत परीक्षा देत असताना सार्वजनिक जातीवाचक अपमानीत केल्याने तिने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं.
संबंधित कविता देशमुख बाईवर चुकीचे गुन्हे दाखल करून तिला वाचवणाऱ्या पोलीस यंत्रणेला आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी चांगलाच चपराक दिला. मयत मुलीच्या मारेकरी देशमुख बाईला जन्मठेप किंवा फासावर चढवल्याशिवाय तसेच योग्य ती कडक शिक्षा केल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही असा विश्वास वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला.
यावेळी राज्य प्रवक्ते ऍड.प्रियदर्शी तेलंग सर, राज्य उपाध्यक्ष ऍड. सर्वजीत बनसोडे सर, जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप, महिला जिल्हध्यक्षा शिल्पा रणदिवे,महासचिव सुनील भोले, महासचिव अजय शिंदे, दीपक बाणाईत, गौतम कांबळे,मनिकर्णा लाटे,सुरेखा वानखेडे, निर्मला गमरे, निकिता कदम, स्मिता लोखंडे,पल्लवीताई शिंदे, संदेश हत्तर्गे, संदीप वाघमारे,राजेश भालेराव, मल्लिनाथ सोनकांबळे, संभाजी वाघमारे, सुनील वानखेडे, सहदेव मस्के इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सौजन्य: प्रबुद्ध भारत
0 Comments