विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य शुल्क वसूल करणाऱ्या व्ही. एन. पाटील लॉ कॉलेजविरुद्ध कारवाईची मागणी!
औरंगाबाद : विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने शुल्क वसूल करणाऱ्या व्ही. एन. पाटील लॉ कॉलेजची मान्यता तात्काळ रद्द करून प्राचार्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे करण्यात आली होती.
व्ही. एन. पाटील लॉ कॉलेज, औरंगाबाद येथे विद्यार्थ्यांकडून प्रॅक्टिकल परीक्षा आणि अंतर्गत परीक्षेच्या नावाखाली सक्तीने शुल्क वसूल केले जात होते. या नियमबाह्य प्रकारावर तात्काळ कारवाई करून जबाबदारांवर कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली होती.
यासंदर्भात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अक्रम खान यांच्या नेतृत्वाखाली उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. वाघमारे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले होते.
परिणामी व्ही. एन. पाटील लॉ कॉलेजला दणका बसला असून, नियमबाह्य शुल्क विद्यार्थ्यांना परत करणार असल्याचे कळवले आहे. विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य वसूल केलेले शुल्क आता सम्यक विद्यार्थी आंदोलनामुळे विद्यार्थ्यांना परत मिळणार आहे.
सौजन्य:प्रबुद्ध भारत
0 Comments