सकाळी जुनाट मोठे सुरुचे झाड वनविभागाच्या कार्यालया पाठीमागील भागात उन्मळुन पडले केवळ दैव बलवत्तर म्हणुन शेजारी राहणारे लोकमतचे पन्हाळा बातमिदार नितीन भगवान यांचे घर वाचले आन्यथा मोठा अनर्थ घडला असता, दुपारी पासुन मुसळधार पावसाला सुरवात झाली आसुन जोरदार वाऱ्याने कांही घरावरचे छप्पर उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पाऊस आणी वारे यामुळे भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे पन्हाळा , करवीर तालुक्यातील विविध भागासह गांधीनगर आणि वळीवडे येथील दोन ठिकाणी झाडे कोसळली.
तर तीन इमारतींवरील पत्र्याचे शेड या जोरदार वाऱ्याने उडून गेली यावेळी शेडमध्ये लावण्यात आलेल्या तीन मोटारसायकल सह एका चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
तसेच गांधीनगर येथील गांधी पुतळ्याशेजारी वादळी पावसाने मोठे झाड रस्त्यावर कोसळले रस्त्यावर कोणीही नसताना ही झाडे कोसळल्याने जीवितहानी टळली आहे. वळीवडे हद्दीतील हुलेमळा येथील कँवरराम कॉलनीमध्ये मोठ्या तीन इमारतीवरील पत्र्याची शेड वादळाने उडून गेली. इमारती खाली पार्किंग केलेल्या तीन दुचाकी आणि एका चारचाकी गाडीवर हे शेड पडल्याने गाड्यांचे मोठे नुकसान झाले तर शेडचा काही भाग इमारतीवर कोसळल्याने नुकसान झाले...
गडहिंग्लज प्रतिनिधी : रविंद्र कांबळे
0 Comments